तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 February 2019

समाजमनाचा आरसा झुंजार पत्रकार विजय चोरडीया


 जिंतूर
 मागील 21 वर्षांपासून निरंतर पत्रकारितेचा वसा घेतलेले व समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळून देण्यासाठी धडपडणारे एक अतुलनीय व्यक्तिमत्व लोकमतचे  विजय चोरडिया यांचा आज वाढदिवस 
       समाजाच्या भल्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून लेखणीचा वापर करणारे व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी वेळेप्रसंगी  समाजातील अनेकांच्या विरोधात जाऊन लेखणीचा वार करणारे कणखर व्यक्तिमत्त्व म्हणजे विजय चोरडिया होय .
      मागील वीस वर्षात तालुक्यातील अनेक घोटाळे त्यांनी बाहेर काढले बावन लाखाचा धान्य घोटाळा असो इतर अनेक घोटाळे त्यांनी चव्हाट्यावर आणले तीन वर्षापूर्वी जिंतूरच्या तत्कालीन तहसीलदारांनी जलसंधारणासाठी दीडशे कोटींच्या कामांना मंजुरी दिली होती परंतु महाराष्ट्राचा अर्थसंकल्पात तरतूद  जलसंधारणासाठी सहाशे कोटी असताना दीडशे कोटींची मंजुरी एका तालुक्यात  देऊन मोठा आर्थिक गैरव्यवहार या प्रकरणात झाला होता या प्रकरणात तत्कालिक तहसीलदारांना लोकमतच्या दणक्यामुळे निलंबित व्हावे लागले होते वरून ही कामे ही रद्द झाली, याशिवाय सहा महिन्यापूर्वी तालुक्यातील 421मजूरांच्या नावे 21 कोटी रुपयांचे कर्ज परस्पर त्रिधारा सुगर्स ने उचलले होते .या मजुरांनी लोकप्रतिनिधी खासदार ,विविध विधीतज्ञ, यांच्याकडे चकरा मारून न्याय मागितला पण कोणीही पुढाकार घेतला नाही ,  हे प्रकरण विजय चोरडिया यांना कळल्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रकरणाच्या मुळाशी जाऊन प्रकरण चव्हाट्यावर आणले तत्कालीन राज्यमंत्री फौजिया खान यांचे पती तहसीन अहमद खान हे कारखान्याचे  चेअरमन होते,  लोकमतच्या माध्यमातून प्रकरणाचा सतत पाठपुरावा केल्यानंतर संबंधितानी मजुरांच्या  नावावर उचललेली रक्कम बँकेत भरणा केली त्यामुळे चोरडिया यांनी लेखणीच्या माध्यमातून 421 मजुरांचे कुटुंब आर्थिक अडचणीतून सावरले आहे तालुक्यातील सामान्य माणसाच्या प्रश्नावर लेखणीद्वारे प्रकाश टाकून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सतत यांचा असो असतो किंबहुना प्रशासन, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात, जाऊन सामान्य माणसाच्या बरोबर  उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा काम लेखणीच्या माध्यमातून त्यांनी केले आहे.
 पत्रकारिता करीत असताना लेखणीचा वापर सामान्य माणसाच्या उपयोगी पडावा यासाठी त्यांचा प्रयत्न असतो मागील पाच वर्षांपूर्वी पत्रकारितेत काम करणाऱ्या पत्रकारांना न्याय मिळावा म्हणून प्रेस क्लब ची स्थापना केली या प्रेस क्लबच्या माध्यमातून बोरी येथील पत्रकार संतोष स्वामी यांच्या अकाली निधनानंतर उदरनिर्वाहाचे साधन नसणाऱ्या स्वामी कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत केली 
भोगाव येथील प्रसाद देशमुख यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबालाही एक लाख रुपयाची मदत संघटनेच्या माध्यमातून केली अशा प्रकारे समाज व पत्रकार यांच्या भल्यासाठी झटणाऱ्या या पत्रकाराचा  आज वाढदिवस
         समाजासाठी सतत लेखणीचा वापर करणाऱ्या  दीनदुबळ्यांची प्रश्न लेखणीच्या माध्यमातून माडणाऱ्या ,समाजमनाचा आरसा असणारे ,त्यांच्या लेखणीचा धाक प्रशासन व राजकीय मंडळींना सतत भासवणारे अतुलनिय व्यक्तिमत्त्व म्हणजे विजय चोरडिया होय  त्यांना तेज न्यूज परिवार कडून वाढदिवसाच्या व उदंड आयुष्याच्या हार्दिक हार्दिक  शुभेच्छा

No comments:

Post a Comment