तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

दुष्काळाशी दोन हात करण्याच्या ट्रेंनिग ला गावकरी रवानाजिंतूर
पाणी फौंडेशन आयोजित जलसंधारण ते मनसंधारण प्रशिक्षण 2019 साठी निघालेल्या बस ला दाखवला हिरवा झेंडा
  तालुका जिंतूर  जिल्हा परभणी 
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 च्या अनुषंगाने जिंतूर  तालुक्यातील 8 गावे आज जलसंधारणातून मनसंधारणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी जाफराबाद  तालुक्यातील  आडा येथे रवाना झाले.यामध्ये ०९ महिला व 32 पुरुषांचा समावेश आहे. दुष्काळाशी दोन हात करण्यास निघालेल्या या गावांना शुभेच्छा देण्यासाठी जिंतूर तालुक्याचे नायब तहसीलदार सोनवणे साहेब  .योग परिवार जिंतूर व तालुक्यात पहिला आलेले गावचे पिंपळकर सर आले होते .
    त्यांनी प्रशिक्षणार्थीशी संवाद साधला मुटकुळे सरांनि आम्ही स्वतः 45 दिवस श्रमदान केलं आहे .हे प्रशिक्षण तुम्हाला घेण्याचे गावाने संधी दिली आहे. आयुष्यातील 4 दिवस तुम्ही निसर्गाच्या भेटीला निघाला आहेत  तर मन लावून शिका प्रत्येक सत्रात सहभागी व्हा.निश्चितच तुम्ही दुष्काळ रुपी राक्षसाचा सामना करण्याचे बळ घेऊन परत याल.तसेच महिला भगिनींनीही कसलीही काळजी करू नये पाणी  फौंडेशन ने सर्व व्यवस्था एकदम उत्तम केलेली आहे.आपण सर्वजण मिळून या दुष्काळाला आपल्या गावबाहेर घालवू तुमच्या मदती साठी योग परिवार  सदैव तत्पर आहे.
   या प्रशिक्षणार्थींना पाठवण्यासाठी जिंतूर तालुक्यातील योग परिवार,    जिंतूर तालुका समन्वयक    अमोल बिरादार ,बाळासाहेब गायकवाड व तांत्रिक प्रशिक्षक एकनाथ कदम  गावचे सरपंच, ,ग्रामस्थ उपस्थित होते.
💧टीम पाणी जिंतूर 💧

No comments:

Post a Comment