तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 February 2019

माहिती कार्यालयाचे गिरी यांना संपादकांनी दिला भावपुर्ण निरोप


प्रतिनिधी
परभणी :- माहिती व जनसंपर्क कार्यालयाचे वरीष्ठ सहाय्यक एन.आर.गिरी यांचा परभणी जिल्ह्यातील सर्व संपादकांच्या वतीने  मंगळवारी सांयकाळी उशीरा सेवनिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी गिरी यांच्या कामाची प्रशंसा केली तर गिरी यांनी देखील त्यांना आलेल्या अनुभवाचे कथन केले. हा कार्यक्रम स्टेशन रोडवरील हॉटेल जायका येथे पार पडला.

 तब्बल 38 वर्ष माहिती खात्यात नौकरी करून सेवानिवृत्त झालेल्या गिरी यांचा मराठवाड्यात मोठा मित्र परिवार निर्माण झाला आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी परभणी जिल्हा माहिती कार्यालयात पदोन्नतीवर ते रुजू झाले होते. त्यांच्या काळात कार्यालयात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले. त्यांनी अनेक नियतकालिकांच्या संपादकांना योग्य मार्गदर्शन केल्याने त्याच्या बद्दलचा आदर वाढला होता. म्हणूनच काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथे पुन्हा पदोन्नती वर बदलून गेलेले आणि तेथेच 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झालेल्या गिरी यांची परभणी जिल्ह्यातील संपादकांनी आठवण ठेवली आहे. नुसती आठवण न ठेवता त्यांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम ठेवून त्यांना शाल श्रीफळ आणि आहेर देऊन त्यांचा गौरव केला. या वेळी संपादक रमेश गोळेगावकर, डॉ. धनाजी चव्हाण, मंदार कुलकर्णी, माहिती कार्यालयाचे प्रवीण भानेगावकर, गणेश देशमुख, पत्रकार सुरेश नाईकवाडे व  राजकुमार हट्टेकर यांनी मनोगत व्यक्त केले. 'राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयात विविध पदावर काम करून गिरी यांनी माणसे जोडली आहेत. संपादक, पत्रकारांना त्यांनी सहकार्य करून मदतीचा हात दिला, त्यांना कधीच विसरता येणार नाही, अशा शब्दांत त्यांचा गौरव करण्यात आला. संपादक डॉ. धनाजी चव्हाण यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार मदन कोल्हे, दिलीप माने, सुरेश जंपनगिरे, गिरीराज भगत, सूरज कदम,गणेश पांडे,हनुमंत चिटनीस,प्रवीण चौधरी,अनिल दाभाडकर, विवेक मुंदडा, विठ्ठल वडकुते, नेमिनाथ जैन, रमेश नाटकर, अरुण रणखांबे, बंडू बनसोडे, कपिल खैराजानी, आबा कड पाटील, प्रमोद बल्लाळ, आश्रोबा केदारे,विलास शिंदे , शंकर इंगळे, किरण स्वामी, प्रवीण चौधरी, कैलास चव्हाण, मदन कोल्हे,मुजीब शेख,राजकुमार हट्टेकर,महेश कोकड,एकनाथ गोधम, दिलीप बोरुल,प्रमोद बल्लाळ माहिती कार्यालयाचे मुजमुले, चव्हाण, निरडे आदींसह जिल्ह्यातील संपादक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment