तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 February 2019

धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास जिंतूर विधानसभा एक जुटीने लढू


 -प्रा डॉ प्रभाकर वजीर

जिंतूर
 महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊन त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी नसता सेलू जिंतूर मतदार संघातील धनगर समाज एक जुटीने एकत्र येऊन विधानसभा लढवू असे बोरी येथे झालेल्या धनगर समाजाच्या बैठकीत निर्धार व्यक्त केला आहे. असे मत प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर वजीर  यांनी केले .
ते बोरी येथे दि. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी  दोन वाजता आयोजित केलेल्या धनगर समाजाच्या बैठकीत अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून धनगर समाज उन्नती मंडळाचे तालुकाध्यक्ष अनंतराव कोरडे कुबेर हुलगुंडे सुधाकर कुकडे दिपक शेंद्रे सखाराम शिंपले नारायण शेंगुळे अर्जुन वजीर विजय दळवे प्रकाश मुळे अशोक खताळ कैलास गडदे बाबुराव काळे सोपानराव ढोणे आदि उपस्थित होते.
 प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने बैठकीस प्रारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाजाच्या आरक्षणाची दिशा व राजकीय दिशा व विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी करण्यात आले होते. कार्यक्रमात वीस कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मार्गदर्शनात अध्यक्षीय समारोप करताना प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर वजीर म्हणाले की घटनेच्या अनुसूचित जमातीच्या यादीत 36 क्रमांकावर असलेली धनगड ही जात अस्तित्वात नसून धनगरच आहे.
 1956 च्या नोंदीनुसार अनुसूचित जमातीच्या यादीत 18 व्या क्रमांकावर गोंड गवारी असा उल्लेख होता पण गोंड-गोवारी उल्लेख असणारी जात गोवारी असून  अनुसूचित जमातीच्या सवलती मिळविण्यासाठी गोवारी समाज आणि कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गोवारी हे आदिवासी असून त्यांना सवलतीचा लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. तशीच केस धनगर समाजाचे असून धनगड ही जातच अस्तित्वात नसल्याने धनगर समाजाला सवलती मिळाव्यात अशी समाजाची अपेक्षा आहे .सद्यपरिस्थितीत धनगर समाज जागृत झाला असून सवलती न मिळाल्यास भाजपच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मेळाव्यात देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश थिटे यांनी तर सुत्रसंचालन कैलास घादगिने तर आभार प्रदर्शन हनुमान गलांडे यांनी केले , कार्यक्रमात आकाश शिंपले यांची असिस्टंट मॅनेजर  पदी बँकेत निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी मारोती शिंपले अशोक शिंपले बंडू तायडे रोहिदास शिंपले वामन शिंपले सुरेश कानडे सुदाम शेळके रंगनाथ मुटकुळे हरिभाऊ गारुडी देवराव चौरे पांडुरंग शिंपले बाळू चौरे भागवत शिंपले रोहिदास शिंपले यांचे सह अन्य धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment