तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 February 2019

सिंदखेड येथील रामेश्वर विद्यालयाच्या एस. एस.सी च्या विद्यार्थ्यांना निरोप


सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. १ __ प.पु.गुरू गणपत बाबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रामेश्वर विद्यालय सिंदखेड या विद्यालायामध्ये एस.एस.सी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
      विद्यालयाचे सचिव तथा मुख्याध्यापक श्री.संभाजीराव करांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभास रं.भ अट्टल महाविद्यालयाचे प्रा.श्री.पाटील सर, बंकटस्वामी महाविद्यालयाचे प्रा.काळे सर व कवीवर्य तथा वात्रटीकाकार प्रा.श्री.सदोलकर सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रथमता थोर नेत्यांच्या प्रतिमेच पूजन करुन प्रमुख पाहुणे प्रा.पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले ध्येय निश्चित करुन त्याचं चितंन केले तरच आपल्याला आपल्या ध्येया पर्यंत पोहचता येईल असे ते म्हणाले. प्रा.काळे सर यांनी आई वडिलांचा आदर करावा आपण ज्या मातीत बालपण शिकलो, त्या मातीची जाणीव ठेवली पाहिजे असे सांगून शुभेच्छा दिल्या. कवी व वात्रटीकाकार प्रा.सादोळकर यांनी आपल्या कवितेतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. विद्यालयाचे सचिव तथा मुख्याध्यापक श्री.संभाजीराव करांडे सर यांनी शालेय जीवनामध्ये विद्यार्थी हा केवळ परीक्षार्थीं न राहता तो शिक्षणार्थी झाला पाहिजे तरच येणाऱ्या काळात त्याला यशाचे शिखर गाठता येईल असे आपल्या समारोपीय भाषणात सांगून शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयामधून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
        विद्यार्थ्यांमधून. कु.जाधव प्रीती, कु.दरेकर आरती, कु.ठोसर प्रतीक्षा, भोसले लक्ष्मण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जाधव मॅडम, श्रीमती गुजर मॅडम, श्री.किशोर शिंदे (सरपंच), श्री.दिगंबर ठोसर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.जाधव प्रतीक्षा व दरेकर वैष्णवी या विद्यार्थीनीनी केले तर अनुमोदन कु.करांडे नम्रता या विद्यार्थीनीने दिले. मान्यवर व उपस्थितांचे आभार कु.चव्हाण मनीषा या विद्यार्थीनीने मानले. निरोप समारंभ कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील शिक्षकांनी मोठे परिश्रम घेतले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment