तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

येवल्यात हरणांना टँकरच्या सहाय्याने पाणी..... .......कुमार मेघे या तरुणाने वन्यजीवांची भागवली तहान......प्रतिनिधी /संतोष बटाव येवला 

----
येवला तालूक्यातील पूर्वेकडील भागात यावेळी पाऊस कमी पडल्याने दूष्काळी परिस्थिती हि दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने हरणांना अन्न व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून तालुक्यातील राजापूर येथील वन विभागात असलेल्या वॉटर होल सध्या कोरडेठाक पडले असल्याने येवल्यातील भारीपचे उपजिल्हाध्यक्ष कुमार मेघे या युवकाने स्वतः खर्चातून वन विभागात असलेल्या वॉटर होल मध्ये टँकरच्या साहाय्याने पाणी टाकुन हरणांसह इतर वन्य जीवांची तहान भागण्याचा प्रयत्न केला. यावेळी कुमार मेघे ,वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ वनसेवक पोपट वाघ, विजय लोंढे ,सुनील गडकर, संजय खेरुड, लाला खेरुड, सुभाष बिवाल बाबासाहेब लोणे आदी उपस्थित होते                 

प्रतिनिधी /संतोष बटाव येवला मो.9850576769

----

No comments:

Post a Comment