तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 February 2019

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत महाराष्ट्रात सुमारे सव्वा कोटी लाभार्थी

बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई: दि.१० केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.त्यामुळे वर्षभरात या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ७२०० कोटी जमा होणार आहेत .राज्यातील अत्यल्प आणि अल्पभूधारक असे ८०टक्के शेतकरी असणार आहेत .या संबंधात अलीकडेच राज्यांच्या मंत्रिमंडळाची बैठकीत काहि बाबींचे साधारीकरण केले .केंद्राच्या या योजनेला मान्यता दिली आहे.ज्या कुटुंबाची दोन हेक्टर पर्यत लागवडीयोग्य जमीन असेल अश्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
पीएम किसान योजना म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने खाली वर्षाला ६००० रुपये देण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने केंद्र सरकारने पीएम किसान पोर्टल सुरू केले आहे.राज्याकडून लाभार्थीची यादी मागवण्यात आली असून २५ फेब्रुवारीपर्यत ती यादी पोर्टल वर अपलोड केली जाणार आहे.त्यामुळे शेतकरी पोर्टलवर जाऊन आपले नाव त्यात आहे की नाही ते पाहू शकतील .http://pmkisan.nic.in असे या पोर्टलचे नाव आहे.या पोर्टलवर शेतकरी नियम अटी पात्र किंवा आपत्र अशी महितीपाहू शकतो .
केंद्र सरकारने या योजनेसाठी काही निकष ही ठरविले आहेत .त्यानुसार आजी माजी आमदार , खासदार ,महापौर , जी.प .अध्यक्ष , सर्व सरकारी अधिकरी व कर्मचारी , सरकारी व निमसरकारी , स्वायत्त संस्थांमधील नियमित अधिकारी , कर्मचारी त्याचप्रमाणे गतवर्षी आयकर भरलेल्या व्यक्ती , १० हजार रुपयापेक्षा आधिक निवृत्तीवेतन असणाऱ्या व्यक्ती , डॉक्टर वकील , आर्किटेक्ट , सीए अशा प्रकारच्या व्यक्ती योजनेमधून अपात्र आहेत

No comments:

Post a Comment