तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 February 2019

सिनेमेटोग्राफर निर्मल जानी काळाच्या पडद्याआड


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई: दि.०९ बॉलीवुड आणि मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर निर्मल जानी यांचे शनिवारी सकाळी मुंबईत ह्रदयविकाराने निधन झाले .निर्मल जानी यांनी १९९९ मधील पथ्रर के फूल या सिनेमापासून सिनेमेटोग्राफीच्या कारकीर्दला सुरवात केली.सर्वाधिक गाजलेल्या शक्तिमान या सिरियलची सिनेमेटोग्राफी निर्मल जानी ह्याचीच होती.निर्मल जानी  सिनेमेटोग्राफी करत असलेली स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय आहे.
दुश्मन , प्यार तो होना ही था ,  कैदी , लैला , ये दिल , आखरी इन्तेकाम , गुमानाम है कोई , कातिल चुडेल , राजू चाचा , बॉर्डर , हद कर दि अपने , ब्लाकमेल , रक्त , अश्या हिट सिनेमाची  सिनेमेटोग्राफी त्यांनी केली.

No comments:

Post a Comment