तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 February 2019

राजकारण आणि उद्याेग व्यवसायातुन सामाजिक बांधिलकी जपणारे आदर्श नेतृत्व- प्रा.मधुकररावजी आघाव सरपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.09
सामान्य कुटुंबातील सुख दु:ख राहत यशाचे एक एक अवघड परंतु यशस्वी शिखर पार करत प्राध्यापक ते पि.एच.डी.नामांकित उद्याेजक व राजकीय वाटचालीत प्रवेश घेऊन सामान्यांच्या सुखामध्ये आपलं सुख पाहणारे परळी तालुक्यातले उगवते नेतृत्व म्हणुन प्रा.मधुकर आघाव सर यांच्याकडे माेठ्या अपेक्षेने पाहिले जाते.

सारडगाव,नंदनज ह्या दाेन्ही गावांमधील मुलींच्या लग्नाला प्रत्येकी १०,००० रूपये आर्थिक मदत करणारे आघाव सर फक्त लग्नापुरतेच नव्हे तर शैक्षणिक आयुष्यातही सर्कल मधील विद्यार्थ्यांना पाहिजे त्या क्षेञात मदत करायला सदैव तत्पर असतात.

स्वत:च्या शेतातील पाणी बंद करून गावकऱ्यांना वेळाेवेळी आधार देणं असाे किंवा गुणगाैरव साेहळ्यात MBBS ला लागणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन Android फाेन गिफ्ट देण्याच आश्वासन असाे...सर नेहमीच तत्पर असतात.
विशेष म्हणजे कुठलीही जाहिरातबाजी न करता आपल्या कार्यातुन ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत.त्यांच्या याच कार्यामुळे सामान्य जनतेबराेबर त्यांचे जिव्हाळ्याचे व विश्वासाचे संबंध निर्माण झाले आहेत.
बाकी राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्याकडुन हा आदर्श नक्कीच घेतला पाहिजे.

दरम्यान आज नंदनज येथील भक्तराम लक्ष्मण गुट्टेयांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत राेख रक्कमेच्या स्वरूपात देण्यात आली.
यावेळी प्रा.आघाव सर यांच्या कडुन रक्कम स्विकारताना मुलीचे पालक भक्तराम लक्ष्मण गुट्टे,नंदवजचे सरपंच अनिल माेकिंद गुट्टे,माजी सरपंच माराेती गुट्टे,दादाराव गुट्टे ग्रा प सदस्य  धनंजय आघाव ग्रा प सदस्य व गावातील तसेच आजुबाजुचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित हाेते.

No comments:

Post a Comment