तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 February 2019

अभिनव विद्यालयातील विद्यार्थी भविष्यातील शास्त्रज्ञ होतील - गणेश गिरी

अभिनव विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
     ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय परळी वैजनाथ येथे राष्ट्रीय विज्ञान दिन संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून गटसाधन केंद्र परळीचे गटशिक्षणअधिकारी गणेश गिरी, उद्घाटक म्हणून संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर, प्रमुख अतिथी म्हणून पोलीस कर्मचारी गित्ते, प्रदिप चाटे व संस्थेचे कार्यवाह सूर्यकांत कातकडे व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील प्रमुख अतिथींच्या हस्ते डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी शाळेच्या प्रांगणात भरवलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक रमेश जाधवर यांच्या हस्ते रिबीन कापून व वैज्ञानिक चमत्कारिक नारळ फोडून करण्यात आले. सर्व मान्यवरांचे शाळेतर्फे स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतूक करुन शाळासत्वार या प्रकारचे विज्ञान प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक महत्त्व पटवून देण्याचा कार्य केले आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणिधाकारी गणेश गिरी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे 21 वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसते आहे नवनवीन यंत्रे, तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत. आपल्या समाजामधील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण मानले जाते आता आपण विज्ञानावर एवढे अवलंबून आहोत की, आपल्याला पहाटे उठण्यासाठी होणारा गजर म्हणजे घड्याळ हे सुद्धा एक विज्ञानाच्या प्रगतीचे छान उदाहरणच आहे. आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या आपण या छोट्याशा मशीनमुळे योग्य वेळेत पूर्ण करतो आणि त्याचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे असे मत व्यक्त करत येणाऱ्या काळामध्ये या छोट्या छोट्या शास्त्रज्ञांची भारत देशाला गरज आहे असे प्रतिपादन केले. या विज्ञान प्रदर्शनात वर्ग पहिली ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी एकूण 80 प्रयोगाचे सादरीकरण केले होते. या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्तीने घेतला. हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करुन मुलांची विज्ञानाविषयी असलेली जिज्ञासा पाहून आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका अश्विनी मुंडे, प्रास्ताविक संतोष मुंडे, तर उपस्थितांचे आभार सहशिक्षक अमोल मोहिते यांनी मानले. हा विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment