तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 February 2019

' उगम ' ग्रामीण विकास संस्थेला समाजकार्याच्या विद्यार्थ्याची भेट




 विद्यार्थ्यानी जाणून घेतले संस्थेचे कार्यक्षेत्र 

विद्यार्थ्याला मिळाले प्रात्यक्षिकाचे धडे 

फुलचंद भगत
वाशिम  - (जिल्हा प्रतिनिधी )दि .9 रोजी स्थानिक येथील सरस्वती समाजकार्य महा विद्यालय वाशिम च्या वतीने एम .एस .डब्लू .भाग दोन च्या विद्यार्थी यांना चौथ्या सेमिस्टर च्या अनुषंगाने संस्था अभ्यास दौरा करून विविध माहिती घेवून सादर करणे अनिवार्य असल्याने हे विध्यार्थी प्रा .पि .एन .संधानी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनां  हिंगोली जिल्ह्यातील कळमनूरी तालुक्यातील ' उगम ' ग्रामीण विकास संस्थेला भेट देवून या संस्थेची कार्यप्रणाली , उदेश्य , कामकाज , ऐतिहासीक लेखाजोखा , संस्थेने राबविलेले विविध उपक्रम व सद्या कार्यरत उपक्रम , संस्थेचा उगम , तेथील पायाभूत सुवीधा , प्रशासकीय यंत्रणा इत्यादी माहिती घेण्यात आली.ही माहिती संस्थेचे अध्यक्ष यादवराव पाईकराव यांनी सखोल माहिती दिली व त्यांनी विद्यार्थ्याना प्रत्यक्ष शिकवून व विविध प्रश्नाच्या आधारे धडे दिले  .यावेळी विद्यार्थी प्रविण पट्टेबहादूर ,अंकुश ढेले , प्रकाश नेतने ,साईनाथ वाघमारे ,अमोल चव्हाण , ओम सानप , सूरज जयस्वाल , कु दैवता चाटसे , मंगल शिरसाठ इत्यादी विद्यार्थी यांनी माहिती घेतली .

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment