तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 27 February 2019

युध्दजन्य सीमेवरील तणाव परिस्थिती असल्यामुळे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आज गुंडाळणार?


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई : दि.२८ मुंबईला जारी करण्यात आलेला हाय अॅलर्ट यामुळे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन गुरुवारीच संपवण्याचा विचार सुरू आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून त्याबरोबरच महत्त्वाचे व्यापारी-नौदलाचे बंदर आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची अशी अनेक आस्थापने आहेत.
 हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनी बुधवारी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. अधिवेशनामुळे विधान भवन परिसरात मोठा बंदोबस्तआहे. शिवाय अधिवेशन काळातील मोर्चांमुळे आझाद मैदान परिसरातही पाच ते सहा हजार पोलीस अडकून पडले आहेत. पोलिसांवरील हा ताण पोलीस अधिकार्यांनी  मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला.  
 युद्धजन्य परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावली. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये दत्ता पडसलगीकर आणि सुबोध जैस्वाल यांनी सद्य परिस्थितीची माहिती दिली. त्यावर विधिमंडळाचे अधिवेशन लवकर संपवण्याबाबत चर्चा झाली. 
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यक्रम शनिवारपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. आज लेखानुदान मंजूर करून अधिवेशन गुंडाळले जाण्याची शक्यता असून, गुरुवारी सकाळी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.

No comments:

Post a Comment