तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 February 2019

पूर्णेत दुष्काळ आढावा बैठक संपन्न


ता पूर्णा: आमदार डॉ मधुसुदन केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय पूर्णा येथे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भारतीय स्टेट बँकेचे शाखा अधिकारी, विद्युत महावितरण चे अधिकारी,यासह तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.यावेळी आमदार डॉ केंद्रे यांनी अधिकाऱ्यांना संपूर्ण तालुक्यात पाण्यासाठी आरडाओरडा होणार नाही याची दक्षता घ्यावी असे ठणकावून सांगितले, कामचुकार अधिकाऱ्यांना धारेवर धरले, शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना कृषी अधिकाऱ्याची धांदल उडाली ,माझ्याकडे कर्मचारी कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे असे कारण त्यांनी सांगितले,लोखंडे पिंपळाच्या सरपंचानी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला,यावर अधिकारी वेळेवर काम करीत नाहीत असे निदर्शनास आले. गुरांच्या व माणसाच्या पाण्याची व्यवस्था करण्यात पाणी कोणालाही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदारांनी दिली यावेळी व्यासपीठावर उपस्थित आमदार डॉ केंद्रे,तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य गजानन आंबोरे,पंचायत समिती सभापती अशोक बोकारे,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शहाजी देसाई,राष्ट्रवादी गंगाखेड विधानसभा प्रमुख श्रीधर पारवे,तालुका उपाध्यक्ष संतोष सातपुते, उपस्थित होते, तहसीलदार यांनी सर्वांचे आभार मानले व बैठक समाप्त झाली असे जाहीर केले.

No comments:

Post a Comment