तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 February 2019

पाथरीत आज श्रीराम मंदिराचा भूमीपुजन सोहळा


किरण घुंबरे पाटील
पाथरी:-कोणी निंदा कोणी वंदा राजकीय जिवनात मला सर्व धर्मीयांनी मनोभावे साथ दिल्याने माझे कर्तव्य आहे की जातिपाती च्या पलीकडे जाऊन मी माझे कर्तव्य केले पाहीजे हेच धोरण अंगिकारत हिंदू जनतेच्या मागणी नुसार आ बाबाजानी दुर्रांनी यांच्या स्थानिक विकास निधितून पंचविस लक्ष रुपये खर्च करून शहरातील जुन्या पाणी टाकी जवळील श्रीराम मंदिराचा जिर्नोद्धार आणि भव्य अशा सभा मंडपाचा भुमीपुजन समारंभ व श्रीराम कथेचे प्रवचन आज १ मार्च शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता संपन्न होणार आहे.
या वेळी प.पु. परिव्राजकाचार्य श्री श्री १००८ स्वामी हरिषचैतन्यानंद सरस्वती महाराज   वेदान्ताचार्य एम.ए तत्वज्ञान काशी. यांच्या हस्ते या मंदिराच्या बांधकामाचे भुमीपूजन आणि रामकथेचे प्रवचन संपन्न होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आ बाबाजानी दुर्रानी हे असणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून जि प चे माजी अध्यक्ष राजेश दादा विटेकर राहाणार आहेत. पाथरी शहरातील हे दुसरे राम मंदिर असून पहिल्या राममंदिरा साठी ही आ दुर्रानी यांनी सभामंडप बांधून दिला आहे. शहरातील अनेक ठिकाणच्या मंदिरांना ही आ दुर्रांनी यांनी स्थानिक विकास निधी अंतर्गत सभामंडप बांधून देत भाविकांच्या इच्छा पुर्ण केल्या आहेत.देश पातळीवर आयोध्येच्या श्रीराम मंदिराचा मुद्दा  गेली तीस वर्षा पासून निवडणुका जवळ आल्याकी हिंदू-मुस्लीम  वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतांना इथे पाथरीत मात्र हिंदू-मुस्लीम  या दोन्ही समाजात भाईचारा असून या श्रीराम मंदिराच्या जिर्नोद्धारा मुळे आ बाबाजानी दुर्रांनी यांचे हिंदू धर्मीयां मधून कौतूक होत आहे. काही मंडळी आ दुर्रानीच्या या कामगिरी मुळे नाक मुरडत असली तरी या मुळे मला काही फरक पडत नाही कारण गेली पस्तीस वर्ष पाथरीची सर्व जनता माझ्या पाठीशी खंबिर पणे उभी असल्या मुळेच मी राजकारणात यशस्वी झालो आणि शहरा सह तालुक्याचा विकास करण्या साठी प्रयत्न करतोय अशी प्रतिक्रीया आ बाबाजानी दुर्रांनी यांनी व्यक्त केली. सर्व धर्मियांना समान न्याय मिळाला पाहिजे हेच माझे प्रथम कर्तव्य असल्याचे ही ते सांगतात.या वेळी महाप्रसाद होणार असून यात गावरान तुपाच्या लाडूची मिठाई ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमा साठी प्रमुख उपस्थिती म्हणून रा काँचे जेष्ठ नेते मुंंजाजी भाले पाटील, नगराध्यक्षा मिनाताई भोरे, उपनगराध्यक्ष हन्नान खान दुर्रानी, भावनाताई नखाते, मिराताई टेंगसे, दादासाहेब टेंगसे, सुभाष आबा कोल्हे, महादेवराव जोगदंड, मनुगुरू कानशुक्ले, तारेख खान दुर्रांनी, अॅड कालिदासराव  चौधरी, न प गट नेते जुनेदखान दुर्रानी, सभापती शिवकन्या ढगे, राकाँ तालुकाध्यक्ष एकनाथराव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष कल्याण चौधरी, नगरसेवक मंगलताई रिंकू पाटील, अर्पिताताई अलोक चौधरी, महादेवराव खारकर, गुंफाताई भाले आणि मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमा साठी मोठ्या संखेने उपस्थित राहाण्याचे आवाहन गजानन उंबरकर, प्रशांत चिद्रवार, विष्णू ढेरे, संजय हराळे, अरुन जोशी, पांडूरंग क्षिरसागर, पिंटू चिकने, प्रविण पाठक, अजय वांगिकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment