तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

व्यसनाला दूर ठेवल्यास आरोग्य, पैसा व विकास साध्य होतो - साहेबराव कुमावतसुभाष मुळे..
---------------
जालना, दि. १२ __  कुमावत समाजाची प्रगती करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. जीवनात शिक्षणाचे महत्त्व खूप आहे. समाज हा शिक्षणाने घडत असतो, त्यामुळे क्षत्रिय कुमावत समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगून व्यसनापासून दूर राहून आपण आरोग्य व पैसा दोन्ही वाचवू शकतो व यातूनच आपला विकास होईल असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र कुमावत संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष साहेबराव कुमावत यांनी केले.
           जालना येथे अखिल महाराष्ट्र कुमावत समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन बारा बलुतेदार महासंघाचे राज्याध्यक्ष कल्याण दळे यांच्या हस्ते झाले. यावेळी बलुतेदार महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष राजेंद्र खंडेलवाल, अधिव्याख्याता डॉ.प्रमोद कुमावत, अहमदनगर जिल्हाध्यक्ष गणेश छल्लारे, संतोष परदेशी, गणेश राजवाल, प्रमोद कुमावत, तुकाराम लोदवाल, भाऊसाहेब नारनवले, गणेश मोहोरे, प्रभा बारवाल यांंची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कुमावत म्हणाले की, क्षत्रिय कुमावत हा समाज शिक्षणाची कास धरून प्रगती करत आहे. समाज बांधवांच्या विविध अडचणी सोडवण्याचे काम संघटना करत आहे. बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्यांनी सर्व योजनेचा लाभ घ्यावा असे सांगत डॉ.प्रमोद कुमावत म्हणाले की, कुमावत समाजाच्या उद्धारासाठी आपण शिक्षण व पैसे ही दोन्ही माध्यमे कशी मिळवता येईल याचा विचार करावा. व्यसनापासून दूर राहून आपण आरोग्य व पैसा दोन्ही वाचवू शकतो. यातूनच आपला विकास होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी सरला कामे, राजू छल्लारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अखिल महाराष्ट्र कुमावत संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी राजू छल्लारे यांची नियुक्ती करण्यात आली.
     जालना येथील कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी अँड. गणेश जाजुरे, उपाध्यक्षपदी दुर्गेश नोकवाल, दीपक नारनवळे, महिला अध्यक्षपदी सुषमा जाजुरे, उपाध्यक्षपदी पूनम कामे, योगिता बगीनवाल यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच यावेळी सहा जणांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री कुमावत, रेणुका जीवनवाल यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यपाल जाजुरे, नंदकिशोर कामे, तुकाराम लोधवाल, दीपक नारनवले, मनोज काकरवाल, जितेंद्र मोरवाल, विजय मोरवाल, प्रेमराज देतवाल, शांतीलाल मोरवाल, राजू जाजुरे, दिगंबर मोरवाल, राजेश जीवनवाल, शिवलाल जाजुरे यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने कुमावत समाज बांधव उपस्थित होता.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment