तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

जिल्हा कारगुहातातील बंदिस्ता साठी साहित्य वाटपफुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)
वाशिम दि.८:(प्रतिनिधी) वाशिम जिल्हा कारागृहातील १५० ते २०० बंदिस्ताचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ होऊन त्यांच्या अंगी असलेल्या स्तुत कलागुणांना वाव मिळाला गुन्हेगारी वृत्ती पासून दूर व्हावे व समाजात आपली चांगली प्रतिमा प्रस्थपित करावी,म्हणून एक छोट्याखाणी कार्यक्रमा अंतर्गत त्यांना मनोरंज व क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले,
समाज सेवेत अग्रेसर असणारी समता फाउंडेशन मुंबई या सामाजिक संस्थेच्या वतीने वाशिम जिल्हा कारागृह येथे बंदिस्त असलेल्या १९० पुरुष बंदिस्त व ११ महिला बंदिस्तांना १० बुद्धिबळ संच, ५ कॅरम,३ एल ए डी टीवी संच, १ व्हॉलीबॉल नेट व २ व्हॉलीबॉल असे मनोरंजन व क्रीडा साहित्य जिल्हा कारागृह अधिक्षक सोमनाथ पाडुळे यांच्या कडे समता फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी संपुर्द केले.यावेळी समता फाउंडेशन मुंबईचे पदाधिकारी व वाशिम जिल्हा कारागृह अधीक्षक सोनाथ पाडुळे, व वरिष्ठ तुरुंगाधिकारी बी एन राऊत,सतिष हिरेकर,अशोक पंडित,आणि कारागृहातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment