तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- मागील एक महिन्यापासुन परळी शहरातील बीएसएनएलची यंत्रणा पुर्णतः कोलमडुन गेली आहे. परळी शहरासह तालुक्यातील विशेषतः अत्यावश्यक कार्यालयासह सर्व मोबाईल बंद पडल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासकीय रुग्णालय, पोलिस स्टेशन, अग्निशामक दल, बस स्थानक व विविध शासकीय कार्यालय आदि ठिाकणचे फोन बंद असल्याने नागरिकांचा या यंत्रनेशी संपर्कच तुटला आहे. त्यामुळे नागिरकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यो लागत आहे.
याबाबत बीएसएनएल कार्यालयात तक्रार करण्यासाठी नागरिक चक्रा मारत असताना या कार्यालयात मात्र शुकशुकाट पहायला मिळत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
बीएसएनएल म्हणजे असुन अडचण नसुन खोळंबा ही परिस्थिती खुद्द शासनानेच ईतर खाजगी कंपन्या जगवण्यासाठी निर्माण केली की काय असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. मग अशीच परिस्थीती असेल तर कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी (बोके) केवळ शासनाची तिेोरी खाली करण्यासाइीच पोसत असल्याचे दिसत आहे. मागील एक महिण्यापासुन परळीसह तालुक्यात संपुर्ण फोन यंत्रना बंद असल्यामुळे अतिआवश्यक असलेले पोलिस, अग्निशामक, बसस्थानक व सर्व शासकीय कार्यालयाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे एखादी घटना घडली तर पोलिस अग्निशामक आणि रुग्णालय या अधिकार्‍यांशी संपर्क साधता येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शहरात एखादी मोठी घटना घडण्याची वाट बीएसएनएल अधिकारी बघत आहेत का ? असा संतप्त सवाल ग्राहकांकडुन व नागरिकांतुन केला जात असुन फोन लावुन दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा अशा पैजा लावल्या जात आहेत. याबाबत तक्रार करण्यासाठी किंवा बंद कशामुळे आहे. ही माहिती विचारण्यासाठी येथील बीएसएनएल कार्यालयात गेले असता या कार्यालयात शुकशुकाट दिसुन येता कोठे तरी कोपर्‍यात बसलेल्या सेवकाला विचारले असता साहेब साईटवर गेले आहेत. एवढेच उत्तर मिळते. त्या अधिकार्‍याचा मोबाईल फोन लावला असता कव्हेरज क्षेत्राच्या बाहेर किंवा बंद असतो त्यामुळे येथील बीएसएनएल कार्यालयात कितीही येरजार्‍या मारल्या तरी काही एक फरक पडत असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे चार हजार पेक्षा जास्त फोन असलेल्या शहरात सततच्या बंद पडण्याच्या तक्रारीमुळे आज संपुर्ण तालुक्यात केवळ 300 ते 350 फोन राहीले आहेत. त्यापैकी सर्वाधिक फोन केवळ शासकीय कार्यालयातच कार्यान्वयीत आहेत. ही सर्व यंत्रना मागील एक माहिण्यापासुन बंद पडल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का अशी मागणी आता नागरिकांतुन होवु लागली आहे.

No comments:

Post a Comment