तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 February 2019

मातोश्री चंद्रभागा आश्रमात महाशिवरात्री निमित्त परमरहस्य पारायण तथा हरिनाम संकिर्तन सोहळामहादेव गित्ते
----------------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
ह.भ.प.ज्ञानोबा संभाजी लटपटे उर्फ कोन्द्रीकर माऊली महाराज यांच्या मातोश्री चंद्रभागा आश्रमात प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री निमित्त परमरहस्य पारायण व हरिनाम संकिर्तन सोहळा मित्ती माघ कृ.10  शुक्रवार दि.01  मार्च पासून प्रारंभ होत आहे. सोहळयाची सांगता मित्ती माघ कृ.14 मंगळवार दि.05 मार्च 2019 रोजी काल्याच्या किर्तनाने होत आहे. 

    परळी शहरातील वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस डोंगर तुकाई रस्त्यावर मातोश्री चंद्रभागा आश्रम आहे. या सोहळयात भावार्थ रामायण रामभक्त ह.भ.प.ज्ञानोबा माऊली उखळीकर हे तर ह.भ.प.प्रभाकर महाराज वाघचवरे व्यासपीठप्रमुख आहेत. श्री परमरहस्य पारायण नेतृत्व श्री शिवकन्या महिला भजनी मंडळ व श्री गुरूलिंग स्वामी महिला भजनी मंडळ करणार आहेत. या सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकडा आरती, 7 ते 10 विष्णू सहस्त्रनाम व परमरहस्य पारायण, सकाळी 10 ते 12 किर्तन, दु.3 ते 4 रामायण, 5 ते 6 हरिपाठ, रात्रौ 7 ते 9 हरिकिर्तन होणार आहेत.  सोहळयातील किर्तन महोत्सवात दि.01 रोजी ह.भ.प.सर्वश्री जगदीश महाराज सोनवणे टोकवाडीकर, विजयानंद महाराज आघाव दौनापुरकर, बंडोपंत महाराज ढाकणे,  मृदंगाचार्य ताल भुषण भरत महाराज सोडगीर, विठ्ठल महाराज कुसळवाडीकर, पंढरीनाथ महाराज भेंडेवाडीकर, प्रभाकर महाराज वाघचौरे, प्रल्हाद महाराज देशमुख , गुरूवर्य ज्ञानोबा माऊली लटपटे यांची किर्तन सेवा सादर होणार आहे.
मंगळवार दि.05 मार्च रोजी सकाळी 10 वा. ह.भ.प.बाळू महाराज लटपटे यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद झाल्यावर सोहळयाची सांगता होईल. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी  लाभ घ्यावा असे आवाहन गुरूवर्य ज्ञानोबा माऊली लटपटे संस्थापक, मातोश्री आश्रम व मातोश्री चंद्रभागा आश्रम विद्यार्थी व भक्त मंडळी परळी वैजनाथ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment