तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते वितरण
प्रतिनिधी
पाथरी:-महाराष्ट्र शासनाच्या कृषी व फलोत्पादन विभागाच्या वतीने सन २०१५-१६ मधील कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उकृष्ठ व उल्लेखनीय कार्यकरणा-या  शेतकरी व अधिकारी यांचा राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते सत्कार व पुरस्कार वितरण समारंभ श्री शिवछत्रपती क्रिडा संकुल म्हाळूंगे-बालेवाडी  पुणे येथे गुरूवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११वा. संपन्न होणार आहे,.
या सोहळ्या साठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषधी प्रशासन ,सांसदीय कार्यमंत्री गिरिष बापट, जलसंपदा, जलसंधारण, सांसदीयकार्य राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय आणि विषेश सहाय्य मदत व पुनर्वसन मंत्री दिलीप कांबळे तसेच कृषी व फलोत्पादन,महसुल व पुनर्वसन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत कृषी व फलेत्पादन सचिव एकनाथ डवले, राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून या वेळी पाथरी तालुक्यातील सारोळा खु. येथील सदाशिव नाथा थोरात यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment