तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 10 February 2019

थंब व्हेरिफिकेशन महाराष्ट्रात कोठेही करू शकता


तेल्हारा: सध्या सुरू आहे त्यासाठी रेशन दुकानात रोज रांगा लागत आहेत, काही रेशन दुकानदार अंगठा दिला नाही तर रेशन मिळणार नाही असे सांगत आहेत त्यामुळे सामान्य नागरीक घाबरून मुंबई, पुणे,सांगली,मद्रास येथून चाकरमानी मंडळींना फक्त अंगठा देण्यासाठी बोलवत आहेत, त्यासाठी 2 ते 3 हजार रु प्रवासखर्च विनाकारण होत आहे ह्याच पार्श्वभूमीवर मी आज तालुका पुरवठा अधिकारी ह्यांची भेट घेतली आणि सत्यता माहीत करून घेतली, थम्ब व्हेरिफिकेशन आहे पण त्यासाठी चाकरमानी मंडळी इकडे गावाकडे गडबडीत येण्याची गरज नाही, ते जिथे आहेत तिथे त्या भागातील रेशन दुकानात जाऊन आपला आधार नंबर देऊन व्हेरिफिकेशन करू शकतात नेट ने सर्व महाराष्ट्र ऑनलाईन जोडलेला आहे, त्यामुळे व्हेरिफिकेशन कुठेही होऊ शकते तसेच ही प्रक्रिया निरंतन सुरू राहणार आहे, अगदी मुंबईत नाही जमले तरी शिमग्याला, मे महिन्यात चाकरमानी गावी आल्यावर व्हेरिफिकेशन करू शकतात. कोणी रेशन दुकानदार मुदत संपेल, धान्य मिळणार नाही असे सांगत असतील तर त्यात तथ्य नाही , आपण कृपया ह्या गोष्टींचा प्रसार करावा ही विनंती

No comments:

Post a Comment