तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

आरोग्य कर्मचाऱ्याची रिक्त पदे भरा रूग्णांची गैरसोय टाळा सरपंच शैलेजाताई भोंगळ यांची मांगणीसंग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील पातुर्डा गावाची लोकसंख्या 20 हजार जवळपास असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र आहे गावाला २३ खेडे लागु असुन बहुताश शेतमजुर गरीब कुटुंबाची संख्या सर्वाधिक असल्याने प्राथमिक आरोग्य केन्द्रातील रिक्त पदामुळे स्थानीक परिसरातील खेडेगावातील रुग्णांची गैरसोय होत असल्याने आरोग्य केन्द्रातील आरोग्य कर्मचारीचे रिक्त पदे भरून रुग्णांची गैरसोय टाळण्यात यावे अशी मांगणी पातुर्डा नगरिच्या लोकनियुक्त सरपंच शैलेजाताई प्रकाशराव भोंगळ यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे पातुर्डा प्राथमिक आरोग्य केंन्द्रात गेल्या काही वर्षा पासुन  नर्सिग असिस्टंट, आरोग्यसेविका,महिला, पुरुष परिचारिक पदे रिक्त असल्याने पातुर्डा परिसरातील खेडेगावातील रुग्णांची गैरसोय होत आहे नर्सिंग असिस्टंट पद असल्याने प्रसुती साठी आणलेल्या महिनां अतोनात सहन करावा लागत असुन उपरोकत पद रिक्त असल्याने  प्रसुती साठी कोणतीच सोय नसल्याने प्राथमिक तपासणी केल्यानंतर शेगाव साईबाई मोटे रुगणालय साठी रेफर केले जाते त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंन्द्राला प्रसुती महिला रेफर करण्याची सवय नेहमीची असल्याने अनेक वेळा प्रसुती रसत्यानेच होतात त्यामुळे आरोग्य विभाग रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप करित रुग्णांच्या जिवाशी खेळणे थांबवुन व होणारी गैरसोय टाळण्यासाठी विना विलंब आरोग्य कर्मचाऱ्याची रिक्त पदे भरण्यात यावे याकडे आरोग्य विभागाच्या वरिस्ट अधिकारी यांनी जातीने लक्ष दयावे अशी मांगणी आरोग्य विभागाकडे लोकनियुक्त सरपंच शैलेजाताई भोंगळ यांनी केली आहे

No comments:

Post a Comment