तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

जालण्याच्या पशु प्रदर्शनात आ दुर्रांनी यांचा रेडा प्रथम


प्रतिनिधी
पाथरी:-जालना येथे 2ते4 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय पशु,पक्षी प्रदर्शनात आ बाबाजानी दुर्रानी यांचा जाफराबादी रेड्याने प्रथम क्रमांक मिळवल्याने नुकताच त्यांचा स्मतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जालना येथे राज्य मंत्री अर्जून खोतकर यांच्या वतीने पशुधन महाएक्सपो-2019 चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात आ बाबाजानी दुर्रांनी यांच्या कडे असलेले विविध प्रकारच्या जातीची पाळीव जनावरे या प्रदर्शनात नेण्यात आली होती. आ दुर्रांनी यांच्या कडे हरीयानातील जाफराबादी जातीची दुभती जनावरे मोठ्या प्रमाणात असून या जातीचा रेतना साठीचा रेडा या प्रदर्शनात नेण्यात आला होता. या रेड्याचा या प्रदर्शनात प्रथम क्रमांक आल्याने आ बाबाजानी दुर्रांनी यांचा प्रमाणपत्र आणि स्मतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment