तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

रेल्वे, एस.टी.मधील भोंदूबाबा व बनावट डॉक्टरांच्या


जाहिराती व पोस्टर काढण्याची अंनिसची मागणी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  रेल्वे स्थानक, रेल्वे तसेच बसस्थानक आणि एस.टी. बसेसमध्ये भोंदू बूवा बाबा तसेच बनावट डॉक्टर यांच्या असणार्‍या जाहिराती व पोस्टर यामुळे सर्वसामान्य जनता अंधश्रध्देला बळी पडत असल्याने जादूटोना विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी निमित्ताने अंधश्रध्दा निर्मुलन समिती शाखा परळीच्यावतीने परळी रेल्वेस्थानक व परळी बसस्थानक प्रमुखांना याबाबत कार्यवाही करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने 2013 पासून कायदा पारित केला आहे. रेल्वे स्थानक तसेच रेल्वे डबे, बसस्थानक, तसेच बसेसमध्ये नियमबाहय, विनापरवानगी भोंदूबाबांच्या व बनावट डॉक्टरांच्या जाहिताींचे स्टीकर व पोस्टर चिकटावलेले दिसतात. हे नियमबाहय व अंधश्रध्दा वाढविणारे आहे. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करावी यासाठी परळी अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्यावतीने दोन्ही ठिकाणी निवेदने देण्यात आली.

यावेळी जिल्हाकार्यध्यक्ष प्रा.मनोहर जायभाये, अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रानबा गायकवाड, जिल्हा कार्यकारीणी सदस्य जी.एस.सौंदळे,प्रा. विलास रोडे, वैजनाथ कळसकर यांच्यासह अंनिसच्या परळी कार्याध्यक्षा सुकेशनी
 नाईकवाडे, शहराध्यक्ष विकास वाघमारे, प्रा.दशरथ रोडे, नवनाथ दाणे, संजीब रॉय, बाबा शेख, संजय पाडमुखे, डुबे सर, धीरज भराडीया आदि पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment