तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

राकाँच्या ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष पदी राठोड


प्रतिनिधी
पाथरी:-महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या परभणी जिल्हाध्यक्ष पदी कमलताई बळीराम राठोड यांची शुक्रवार 8 फेब्रुवारी रोजी राकाँ प्रदेशाध्यक्ष अा जयंत पाटील यांच्या हस्ते औरंगाबाद येथे नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
ही नियुक्ती राकाँ ओबीसी सेल चे प्रदेशाध्यक्ष इश्वर बाळबुधे यांनी केली असुन यात म्हटले आहे की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा शरद पवार प्रदेशाध्यक्ष आ जयवंत पाटील, विधानसभेचे गट नेते आ अजित पवार, आ छगन भूजबळ यांना अभिप्रेत असलेली संघटना बांधनी साठी आपण प्रयत्नशिल राहाल,पक्ष बळकटी करणा साठी  व मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्य ओबीसी घटका पर्यंत पोहचवण्या साठी व त्यांच्या उत्थना साठी आपण प्रयत्नशिल राहाल. या वेळी राकाँच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा माजी मंत्री फौजिया खान, राकाँ ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष इश्वर बाळबुधे आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती. कमलताई राठोड यांच्या निवडी बद्दल राकाँ जिल्हाध्य आ बाबाजानी दुर्रानी, आ विजयराव भांबळे, आ मधूसुदन केंद्रे, जि प चे माजी अध्यक्ष राजेश दादा विटेकर, सोनाली देशमुख,नंदाताई राठोड आणि राकाँच्या पदाधिका-यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment