तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

महिला सबलीकरण व सक्षमीकरणावर भर देण्याकरीता


मोताळा येथे हळदी-कुंकुचा कार्यक्रम संपन्न

मोताळा:- (जावेद खान)महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी तसेच नवीन वर्षाच्या तसेच मकरसंक्रांती निमित्ताने रविवार 10 फेब्रुवारी   4 वाजेच्या सुमारास मोताळा शहर परीसरातील महीलांसाठी स्थानिक बुलढाणा अर्बन समोरील मैदानात सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. 
           सदरच्या कार्यक्रमाला महीलांचा उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला कार्यक्रमात महिलांनी मोठया संख्येने आपला सहभाग नोंदविला समाजात वावरतांना महिलांना येणाऱ्या अडीअडचणी तसेच शहरात दारू बंदी,महिलांचे सक्षमीकरण,जलसंवर्धन बाबत उपस्थित महिलानी सखोल असे मार्गदर्शन केले
       सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र एन. जैन यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाला सौ नंदाताई सपकाळ,माजी नगराध्यक्ष सौ माधुरीताई देशमुख,डॉ सौ छाया रविंद्र महाजन,सौ अर्चना गणेश पाटील, महिला बालकल्याण सभापती सौ छाया दिलीप वाघ,नगरसेविका डॉ सौ तेजल शरद काळे, जितेंद्र एन जैन,जैन संघटनेचे जिल्हा समन्वय शेखरसेठ संचेती,प्रेस क्लब अध्यक्ष गणेश पाटील,मधुसूदन सपकाळ,प्रेस क्लब सचिव जावेद खान,प्रा गणेश झंवर याच्या सह मोठ्या संख्येने महिला वर्गाची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment