तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

मोरकरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांचे काल्याचे किर्तन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 
तालुक्यातील मौजे मोरकरवाडी येथील श्री महारुद्र अनुमान मंदिरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहास प्रारंभ दि.05 फेब्रुवारी 2019 रोजी होणार आहे. तर सांगता सोमवार दि.11 फेबु्रवारी 2019 रोजी सांगता होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी मौजे मोरकरवाडी, ता.परळी वैजनाथ,जि.बीड यांनी केले आहे. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की, अखिल मानवात सात्यिक आध्यात्मिक समाधान लाभावे या उच्च ध्येयाने प्रेरीत उत्सवाचे स्वरुप अतिशय भव्य स्वरुपात होत आहे. आठराव्या वर्षी ही श्री महारुद्र अनुमान कृपेने व वै.बंकट तात्या सावरगांवकर यांच्या प्रेरणेने मोरकरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. जगमान्य भक्तांना निमंत्रित केले आहे. या अपूर्व संधीचा भाविकांनी  लाभ घ्यावा हि विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. आळस न करी या लाभाचा । तुका विना कुणबीयाचा ॥ श्री कृष्ण गोविंदा हरे मुरारी । हे नाथ नारायण वासुदेव । सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवुनिया ॥ वाचावी ज्ञानेश्वरी । डोळा पाहावी पंढरी ॥  शरण शरण हनमंता । तुम्हा आलो रामदुता ॥    ज्ञानेश्वरी व्यासपीठ प्रमुख म्हणुन ह.भ.प.श्री.दत्तात्रय महाराज मुंडे (दगडवाडी) साथ ह.भ.प.श्री.नितीन घुगे हे साथ देणार आहेत. या सप्ताहामध्ये दररोज सात दिवस पहाटे 4 ते 5 काकडा आरती, 6 ते 7 विष्णुसहस्त्रनाम, सकाळी 7 ते 10 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दु. 11 ते 2 तुकाराम गाथा भजन, 2 ते 4 भावार्थ रामायण, दुपारी 4 ते 5 रामकृष्ण हरी जप, सायं. 6 ते 7 धुपारती, रात्रौ 9 ते 11 हारीकिर्तन, 12 ते 4 हरिजागर होणार आहे. या सप्ताहमध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन होणार आहेत. यामध्ये सर्वश्री मंगळवार, दि.05 रोजी ह.भ.प.विनायक महाराज गुट्टे गुरुजी, बुधवार, दि.06 रोजी ह.भ.प.निर्गुण महाराज कातकडे उंडेगाव, गुरुवार, दि.07  रोजी ह.भ.प.व्यंकट महाराज दगडवाडीकर, शुक्रवार, दि.08 रोजी ह.भ.प.मनोहर महाराज आळंदीकर, शनिवार, दि.09 रोजी ह.भ.प.तुकाराम महाराज शास्त्री टोकवाडी, रविवार, दि.10 रोजी ह.भ.प.कृष्णकांत महाराज सताळकर यांचे किर्तन होणार आहेत. सोमवार, दि.11 रोजी  ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांचे दु.1 ते 3 काल्याचे किर्तन व सार्वजनिक महाप्रसाद होणार आहे.  त्यानंतर सप्ताहाची सांगता होणार आहे. यासप्ताह मध्ये मृदंगाचार्य जनार्धन बाबुराव मुंडे, वृषीकेत दलपतराव दहिफळे यांची साथ राहणार आहे. या सप्ताहमध्ये सात दिवस खोडवा सावरगांव, येळंब, हाळम, भोजनकवाडी, दैठणा घाट, गुट्टेवाडी, सौंदना, सेलमोहा, आंतरवेली, तांदळवाडी, कोद्री, पिंपळा, ढेबेवाडी, लमाणतांडा या पसिरातील गुणीजन व गायनार्चा व मृदंगाचार्य भजनी मंडळी हजर राहतील.  सावरंगाव व दैठणा घाट, उंडेगांव भजनी मंडळी सात दिवस हजर राहतील. नोट ः परळी ते धर्मापुरी मार्गावर खोडवा सावरगावं स्टे. आहे. तेथुन पूर्र्वेस 2 किमी अंतराव मोरकरवाडी गाव आहे. टीप वेळेनुसार कार्यक्रमात बदल केला जाईल.  या सर्व कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी मौजे मोरकरवाडी, ता.परळी वैजनाथ जि.बीड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment