तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 February 2019

हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमातून गंभीरे परिवाराने दिला पाणी बचतीचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेशअंबाजोगाई (प्रतिनिधी) :-  हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमातून येथील गंभीरे परिवाराने पाणी बचतीचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला यात त्यांनी प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरा,ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत करा,नियमित कचरा कुंडीचा वापर करून परिसर स्वच्छ ठेवा नेत्रदान करा आधी विद्या दान मन कन्यादान,सुदृढ बालक घडवूया,देश बलवान करू या व सुख समृद्धीचा झरा,शिक्षण हाच मार्ग खरा आदी मौलिक विचार सांगणारे डिजीटल बॅनर हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमात महिला भगिनींचे लक्ष वेधून घेत होते. अभिनव पद्धतीने मकरसंक्रांत कार्यक्रमानिमित्त आयोजित हळदी कुंकूवातून सामाजिक संदेश देवून गंभीरे परिवाराने शहरात सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली. 


येथील वांगदरी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.अश्वीनी विजय गंभीरे,नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा सभापती सौ.शिल्पा संजय गंभीरे, सौ.वंदना दत्तात्रय केंद्रे यांनी गंभीरे निवास हनुमान नगर परिसरात मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी गंभीरे परिवाराच्या वतीने शहरातील उपस्थित महिला भगिनींना गुलाब पुष्परोपांचे वाटप ही करण्यात आले.सोबतच तिळगुळ देवून आनंद द्विगुणित करण्यासाठी गायक सुभाष शेप यांच्या बहारदार संगीत रजणीचे आयोजनही करण्यात आले होते.या कार्यक्रमास केज विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आ. प्रा.सौ.संगीताताई ठोंबरे,अंबाजोगाईच्या नगराध्यक्षा सौ.रचनाताई मोदी, महिला आयोगाच्या सदस्या गयाताई कराड, आरतीताई कोपले, नगरसेविका संगीताताई काळे,नगरसेविका सविताताई लोमटे, नगरसेविका कांचनताई तौर,नगरसेविका राजश्री मोदी, नगरसेविका वासंतीताई बाबजे, नगरसेविका उज्वलाताई पाथरकर, नगरसेविका जयश्रीताई साठे, नगरसेविका संगीताताई व्यवहारे यांच्यासह जयश्री कराड, डॉ.शुभदा लोहिया,सारिकाताई घुगे,अशाताई कराड, डॉ.सौ.रेड्डी,डॉ.सौ.तोषणीवाल,डॉ.सौ.तोंडगे यांच्यासह नगर परिषदेच्या महिला कर्मचारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
गंभीरे परिवाराच्या वतीने वांगदरी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.अश्विनी विजय गंभीरे,नगर परिषदेच्या पाणी पुरवठा सभापती सौ.शिल्पा संजय गंभीरे, सौ.वंदना दत्तात्रय केंद्रे यांनी उपस्थित महिला भगिनींचे यावेळी स्वागत केले.तसेच यावेळी त्यांनी सुमारे 1300 महिला- भगिनींना ‘रोझ-डे' चे निमित्त साधुन मकरसंक्रांती हळदी व कुंकूवानिमित्त गुलाब पुष्पांची रोपे भेट म्हणून देण्यात आली.या कार्यक्रमात प्रशांत नगर,हौसिंग सोसायटी,हनुमान नगर,ज्ञानेश्वर नगर, ओमशांती कॉलनी, विद्याकुंज कॉलनी, हावळे गल्ली, बन्सीलाल नगर आदी भागातील महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment