तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 February 2019

शेवटच्या घटकातील वंचितांना न्याय देण्याचा संकल्प घेवून राजकारणात आलो.--ना.सुधीर मुनगंटीवार
  मंत्री-वित्त, नियोजन 

गणेशोसत्वापूर्वी अवघा महाराष्ट्र करणार चुलमुक्त -

मुंबई दि. : राज्यात 45 लाख कुटुंबाकडे गॅस जोडणी नाही  त्यांना गणेशोत्सवापूर्वी  गॅस जोडणी   देऊन अवघा महाराष्ट्र चुलमुक्त करणार असल्याची माहिती अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 
आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.  यावेळी अन्न  नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, विभागाचे  प्रधान सचिव  महेश पाठक, चंद्रपूर चे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्यासह सर्व सम्बधित उपस्थित होते. 

 मुख्यसचिवांनी या संदर्भात सर्व सम्बधितांची बैठक घ्यावी अशा सूचना देऊन श्री मुनगंटीवार म्हणाले की , चुलीच्या धुरापासून महिलांच्या डोळ्यांना होणारा त्रास थाम्बविण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना देशभर राबविली जात आहे. या  योजने अंतर्गत  महाराष्ट्रात ज्या लाभार्थ्यांना गॅस जोडणी देणे शक्य आहे त्यांची यादी तयार करण्यात यावी. उर्वरित जे लाभार्थी उज्वला योजनेत लाभ घेऊ शकत नाहीत त्यांना  गॅस जोडणी देण्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईन. अन्न नागरी पुरवठा विभागाने याचा सविस्तर अभ्यास करून लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करावा, त्यास मंजुरी दिली जाईल. 

बल्लारपूर  विधान सभा क्षेत्राचा आढावा

अर्थ मंत्र्यांनी याच बैठकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील गॅस जोडणीचा ही आढावा घेतला.  या क्षेत्रात गॅस नसलेल्या शिधापत्रिकांची संख्या 11083 इतकी आहे. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी या शिधापत्रिका धारकांना गॅस जोडणी देऊन पूर्ण विधानसभा क्षेत्र गॅसयुक्त करण्यासाठी त्यांचे रेशनकार्ड, बँक खाते आणि बँक खात्याची आधार कार्डशी जोडणी अशी तीन कामे प्राधान्याने हाती घ्यावीत,  गॅस जोडणीयुक्त तालुक्याचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी फिरते वाहन तयार करावे जे दिलेल्या तारखेस निश्चित वेळी निश्चित ठिकाणी जाऊन फॉर्म संकलित करील. या वाहनात प्रशिक्षित  कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत जेणेकरून गॅस जोडणीसाठी सादर केलेला अर्ज अचूकपणे भरला की नाही हे पाहिले जाईल,  विधानसभा क्षेत्रात अर्ज स्वीकारण्यासाठी समन्वयक नेमण्यात यावेत अशा सूचना ही त्यांनी यावेळी केल्या.  
या विधानसभा क्षेत्रात बल्लारपूर येथे 2807, मूल मध्ये 6346, पोंभूरणा, 1196, चंद्रपूर ग्रामीण 734 अशी  एकूण 11083 गॅस नसलेल्या शिधापत्रिकांधारकांची संख्या आहे. त्यांना येत्या काही दिवसात गॅस जोडण्या देण्याबाबतच्या कार्यवाहीला वेग  देण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment