तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

स्वीडनचे पंतप्रधान यांच्या सल्लागारपदी मराठमोळ्या नीला विखे-पाटील यांची नियुक्ती


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई: सोशल डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षांच्या आघाडीचे नेते स्टीफन लोफेवन यांच्या सल्लागारपदी मराठमोळ्या नीला विखे-पाटील यांची नियुक्ती झाल्याने पूर्ण देशातून त्यांच्यावर शुभेच्छाच वर्षाव होत आहे. नीला पंतप्रधान कार्यालयातील आर्थिक, कर, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार या विषयी कामे पाहणार आहेत .
 बत्तीस वर्षीय नीला या ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत. अशोक विखे पाटील हे विखे फौंडेशन चे चेअरमन आहेत.पूर्ण महाराष्ट्राभर त्यांचे शैक्षणीक जाळे आहे.त्यांचा महाराष्ट्रात १०२ शैक्षणीक संस्था आहेत माजी केंद्रीय मंत्री स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या नात असून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची त्या पुतणी आहेत
एक नजर त्यांच्या कारकीर्दवर 
नाव : नीला अशोक विखे-पाटील वय ३२वर्ष 
जन्म : स्वीडनमध्ये प्रारंभीची काही वर्षे भारतात वास्तव्य केले आहे
शिक्षण :अर्थशास्त्र आणि कायदा या विषयात एमबीए 
नीला स्वीडन ग्रीन पार्टीच्या बोर्ड मेंबर आहेत ही संस्था पर्यावरण वाचवण्याचे काम करते स्वीडिश यंग ग्रीन',ग्रीन पार्टी गोथेनबर्ग', 'ग्रीन स्टूडेंट ऑफ स्वीडन' या संस्थे बरोबर देखील कामे करतात .

No comments:

Post a Comment