तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

संत तुकाराम विद्यालयाचा धनराज मुंडे बाल धमाल मध्ये चमकलापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

नागापूर कॅम्प येथील संत तुकाराम विद्यालयाचा विद्यार्थी धनराज रामभाऊ मुंडे याने बाल धमाल स्पर्धेत एक पात्री अभिनयातून तालुक्यातून दुसरा क्रमांक पटकावला


        अस्सल ग्रामीण शैलीत सादर केलेल्या त्याच्या एकपात्री अभिनयाला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ राव मुंडे नटराज रंगमंदिरात उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली मराठवाडा साथी या वृत्तपत्राच्या वतीने आयोजिलेल्या बाल धमाल स्पर्धेत त्याने हे यश संपादन केले


        त्याच्या या यशाबद्दल वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा टी पी मुंडे सर सचिव भिसाराम राठोड कोषाध्यक्ष आत्माराम कराड सहसचिव प्रा विजय मुंडे जि प सदस्य प्रदीप भैया मुंडे मुख्याध्यापक शंकर सोळंके उपमुख्याध्यापक सुगंध गुट्टे तसेच नरहरी मुंडे वसंत डोंगरदिवे शंकर पवार ज्ञानोबा गडदे अनिल पांचाळ कलाशिक्षक शिवकुमार लुले मनोज एस के चंद्रकांत स्वामी श्रीमंत कांगणे मधुकर राडकर आदींनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment