तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 February 2019

वाढदिवसाचा खर्च टाळत सामाजिक संस्थांना अठरा हजाराची मदत;राविकाँ पाथरी तालुका अध्यक्ष कार्तिक घुंबरेंचा सामाजिक उपक्रमप्रतिनिधी
पाथरी:-हल्ली घरोघरी लहान थोरांचे,आप्त,इष्ट नातेवाईक आणि मित्रांचे वाढदिस मोठा खर्च करून साजरे करण्याची क्रेझ निर्माण झाली असून या साठी करण्यात येणा-या झगमटाला युवा वर्ग मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतो.सोशल मिडीया वर या वाढदिवसाचे फोटो शेअर केले जातात.या सर्वाला अपवाद ठरत पाथरी तालुक्या सह परभणी जिल्हा आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात दुष्काळाचे मोठे संकट असल्याने या वर्षी वाढदिवसाला होणारा खर्च पाथरी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील  या युवकाने दोन सामाजिक संस्थांना अठरा हजारांची मदत करून आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करून समाजा पुढे आदर्श निर्माण केला.

10फेब्रुवारी रोजी पाथरी चे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील यांचा 21 वा वाढदिवस मोठा मित्र परिवार असल्याने खर्च ही होणार मात्र या सर्वाला फाटा देत केवळ शुभेच्छांचा स्विकार करून या साठी कपडे,केक,जेवन हार,आदी कारणांना होणारा खर्च टाळून जन्मभूमी फाऊंडेशन पाथरी तालुक्यात वाघाळा-फुलारवाडी या ठिकाणी बांधत असलेल्या बंधारा कामा साठी अध्यक्ष सदाशिव थोरात यांच्या कडे दहा हजार रुपये मदतीचा धनादेश दिला तर शहरातील भारत धनले चालवत असलेल्या साई क्रिडा मंडळ आणि व्यायाम शाळेतील गरीब,आदीवासी, उसतोड कामगारांची मुले यांना कब्बडी साठीच्या गणवेशा साठी आठ हजार अशी अठरा हजाराची मदत रविवारी 10 फेब्रुवारी रोजी करून सामाजिक उपक्रमाला हातभार लावत समाजा पुढे नवा आदर्श ठेऊन या दुष्काळात सर्वांनी वाढदिवस साजरे न करता चांगल्या सामाजिक उपक्रमां साठी तो पैसा देण्याचे आवाहन ही केले. या वेळी प्रा डॉ सुरेश सामाले, सौ सामाले, पं स सदस्या   सौ थोरात ,जन्मभूमी फाऊंडेशन चे अध्यक्ष सदाशिव थोरात, किरण घुंबरे पाटील,सौ मिनाक्षी घुंबरे पाटील, संदिप धनले, हारकाळ, भिमराव तारे, सतिष काळदाते, महेश तौर, खेळाडू आदी मोठ्या संखेने उपस्थित होते.कार्तिक घुंबरें नी राबवलेल्या या उपक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ बाबाजानी दुर्रानी यांच्या सह सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

No comments:

Post a Comment