तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 February 2019

मंगरूळपीर तहसीलदार यांचे चौकशी कालावधीत निलंबन करण्याची मागणी




 रेती तस्करी ऑडिओ क्लिप प्रकरण 

फुलचंद भगत
मंगरुळपीर ता ११/(जिल्हा प्रतिनिधी) येथील बहुचर्चित तहसील कार्यालयातील रेती तस्करी ऑडिओ क्लिप प्रकरणात तहसीलदारांची अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडून चौकशी सुरु असून या चौकशी कालावधीत तहसीलदार यांचे निलंबन करावे अशी मागणी आम आदमी पक्षाचे वतीने  ता ११ रोजी विभागीय आयुक्त, अमरावती यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
                                निवेदनात नमूद आहे की, तहसीलदार मंगरूळपीर यांची कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात आपल्या द्वारे चौकशी अधिकारी नेमून अप्पर जिल्हाधिकारी वाशीम यांचे मार्फत चौकशी सुरु आहे. दि. 08/02/2019 रोजी आमच्या कार्यकर्त्यांची अप्पर जिल्हाधिकारी यांचे समक्ष  सुनावणी झालेली आहे. 
परंतु या कालावधीत ज्यांचे विरुध्द चौकशी सुरु आहे ते   तहसीलदार, मंगरूळपीर हे आपल्या पदावर कार्यांन्वित आहेत. व ते आपल्या पदाचा दुरुपयोग करून चौकशीला प्रभावित करू शकतात अशी आम्हांस भीती आहे. 
तरी सदर अधिकाऱ्याला चौकशी कालावधीत पदावरून निलंबित करावे जेणेकरून चौकशी कार्यवाही निष्पक्षपणे होण्यास मदत होईल.असे निवेदनात म्हटले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment