तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

परळीतील रोडे चौकात माता रमाई जयंती साजरी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शहरातील स्व.बाळकृष्ण रोडे चौकात कोट्यावधीची माता रमाई यांची मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

     चौकात माता रमाई यांचे भव्य अशी प्रतिमा लावण्यात आली होती. प्रतिमेचे पूजन संभाजीनगर पोलिस स्टेशनचे डी.बी.प्रमुख रमेश सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धम्मानंद मुंडे,विश्वनाथ गायकवाड,  मिलिंद घाडगे, महिंद्र रोडे, पत्रकार रानबा गायकवाड, मोहन व्हावळे, धिरज जंगले, अनंत इंगळे, महादेव रोडे, राहुल घोबाळे, राहुल गोदाम,  गौतम साळवे, यशपाल मुंडे, पोलिस कर्मचारी दत्ता गित्ते, लाला बडे, रवि मुळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

          याप्रसंगी मान्यवरिंनी माता रमाई विषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात लावण्यात आलेली भव्य प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शहरातील नागरिक बहुजन बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन रोडे, शुभम इंगळे, दिपक ताटे, विकास वाघमारे, सत्यदिप रोडे, केशव गायकवाड, राजाभाऊ रोडे, ओम दहिवडे, आकाश ताटे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment