तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

वीरशैव लिंगायत समाज वतिने


परळीत श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सवाचे आयोजन

8 ते 10 फेबु्रवारी दरम्यान तीन दिवसीय परमरहस्य पारायण, प्रवचन, धर्मसभा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतिने श्रीसंत शिरोमणी मन्मथ स्वामी जन्मोत्सवाचे दि.8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय परमरहस्य पारायण, प्रवचन व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री गुरूलिंग स्वामी मठ संस्थान (बेलवाडी) परळी वैजनाथ येथे दि.8,9 व 10 फेब्रुवारी 2019 रोजी वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतिने श्रीसंत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या जन्मोत्सवानिमित्त तीन दिवसीय परमरहस्य पारायण, प्रवचन व धर्मसभा आयाजन करण्यात आले आहे.रविवार दि.10 फेब्रुवारी रोजी श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी यांचा जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा दुपारी 12.21 वा. होणार आहे.दररोज सकाळी 7 ते 10 या वेळेत श्री परमरहस्य पारायण होणार आहे. शुक्रवार दि.8 फेब्रुवारी रोजी दिप प्रज्वलन गुरूवर्यांच्या हस्ते व पाद्यपुजा, आरती होणार असून सकाळी 10 ते 11 वा. श्री गुरू ष.ब्र.108 वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचे आशिर्वचन होणार आहे. दि.9 व 10 फेबु्रवारी रोजी दुपारी 12 ते 1 वा. श्री गुरू ष.ब्र.108 वेदांताचार्य व शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांचे आशिर्वचन होणार आहे. दि.10 फेबु्रवारी रोजी शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य साखरखेर्डेकर महाराज यांच्या आशिर्वचनानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

तसेच शुक्रवार दि.8 फेब्रुवारी रोजी श्री वैद्यनाथ भजनी सेवाभावी संस्था, शंभु महादेव भजनी मंडळ, गजानन भजनी मंडळ, शनिवार दि.9 फेब्रुवारी रोजी शंभु महादेव सेवाभावी संस्था भजनी मंडळ, हरीहर भजनी मंडळ, श्रीसंत मन्मथ स्वामी संगीत विद्यालय महिला भजनी मंडळ, तर रविवार दि.10 रोजी श्री गुरूलिंग स्वामी भजनी मंडळ, शिवकन्या भजनी मंडळ, शनैश्वर भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. 

या कार्यक्रमाचा परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतिने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment