तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 February 2019

ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस मनसेला किंवा कॉंग्रेसला सोडणार नाही : सचिन अहिरबाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई : दि.०९ जशी जशी लोकसभा निवडणूक जवळ जवळ येत आहे.तसे  राजकारण पेटत आहे.ईशान्य मुंबईची जागा मनसेच काय, पण काँग्रेसलादेखील सोडणार नसल्याचे राष्ट्रवादी मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी विक्रोळी टागोर नगर येथे राष्ट्रवादीच्या 'निर्धार परिवर्तनाचा' या अभियानाच्या अंतर्गत आयोजित सभेत स्पष्ट केले आहे. 
त्यामुळे ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीने आपला उमेदवार संजय दिना पाटील यांना घोषित केले आहे.संजय पाटील हे १५ व्या लोकसभेत  खासदार म्हणुन  ईशान्य मुंबईचे प्रतिनिधीत्व २००९ ते २०१४ साली त्यांनी केले होते.त्यावेळी त्यांचा विरोधात भारतीय जनता पार्टीचे किरीट सोम्मया , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिशिर शिंदे , बसपा चे अशोक चंद्रपाल सिंग , भारीप बहुजन महासंघाचे संजय कोकरे हे होते 
आता एक नजर मताच्या आकडेवारीवर  २००९ ते २०१४              
 संजय पाटील - २१३५०५
किरीट सोम्मया - २१०५७२
 शिशिर शिंदे - १९५१४८
अशोक चंद्रपाल सिंह - २४९३४
संजय कोकरे - ५६१२
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आता बहूतेक सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपाचा विजय रथ रोकणार का आता याकडे सर्वाचे लक्ष्य लागले आहे.नोटबंदी , जीएसटी , तसेच महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे.शेतकर्या विषयीचे चुकीचे नियोजन यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत.

No comments:

Post a Comment