तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 February 2019

नाभिक समाजातील युवतीवर अत्याचार करुन खुन करणा-या आरोपींवर कठोर कारवाई करा!


समता परिषदेचा आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी/पाथरी: करपेवाडी ता.पाटण जि.सातारा येथील नाभिक समाजाच्या बारावीत शिकणा-या युवतीवर अत्याचार करुन हत्या केलेल्या आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे पाथरी तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तहसिलदार यांना करण्यात आली.

दिनांक २२ जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या करपेवाडीतील एका बारावीत शिकणा-या तरुणीवर अमानुष अत्याचार करुन हत्या करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणातील आरोपी अजुनही मोकाट फिरत असुन, त्यांच्या तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत लवकरात लवकर कारवाई न केल्यास समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. शाहु, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आणी छत्रपति शिवरायांच्या न्यायप्रिय राज्यात ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडुनही षंढ प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधुन शांत राहिले. या आरोपींवर एवढा कालावधी उलटुनही काहीच कारवाई होत नाही. यावर महाराष्ट्रभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

पाथरी तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनेही आज नाभिक समाजाच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत याबाबत निवेदन देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर समता परिषदेचे शहराध्यक्ष गोविंदराव हारकळ, अजयराव थोरे, संतोष वाघमारे, नारायणराव पितळे, 'राविकाँ'चे कार्तिक घुंबरे पाटील, गजानन वाघमारे, शाहुराव कावळे, नाभिक समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष महादेव राऊत, युवक तालुकाध्यक्ष धनराज वाकळे, रंगनाथराव विरकर, पांडुरंग चिंचाणे, कैलास बेदरे, भागवत पितळे, बलभिम गिराम, नबाजी विरकर, भास्कर घाटुळ, मनोज बोराटे, बालाजी सोगे, सोमेश्वर पितळे, ज्ञानेश्वर चिंचाणे, अविनाश झिंजुर्डे, हनुमान चिंचाणे, शरद गिराम आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

No comments:

Post a Comment