तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 February 2019

धनादेश अनादर प्रकरणात सहा महीने कारावास व दंडाची शिक्षा


सुभाष मुळे..
----------------
गेवराई,दि. २८ __ जय भवानी साखर कारखान्यास ऊस तोड़ वाहतूकदार जालींदर देवकर रा.दिमाखवाडी यांनी दिलेला धनादेश न वटल्याने व साक्षपुुराव्यात आरोपी विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने गेवराई न्यायालयातील मा. न्या. एम. पी.एखे मॅडम यांनी आरोपी जालींंदर देवकर यास सहा महीने कारावासाची व दंडाची शिक्षा सुनावली.
       याबाबत सविस्तर माहीती अशी की, जयभवानी साखर कारखान्यास सन. २०१० - २०११ या गाळप हंगामात जालींदर नामदेव देवकर यांनी जयभवानी कारखान्या सोबत ऊसतोड वाहतुकीचा करार केला होता व जयभवानी कारखान्याकडून सदर करारापोटी 3.००,०००/- रुपये उचल घेतली होती, परंतु आरोपी जालींदर देवकर हा करारा प्रमाणे जयभवानी कारखान्यावर कामास आला नाही व आरोपीने जयभवानी कारखान्याची फसवणूक केली. त्यानंतर जयभवानी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी  आरोपी जालींदर देवकर यांच्या मागे त्यांनी उचल घेतलेल्या रकमेच्या वसुलीसाठी तगादा लावल्यानंतर जालिंदर देवकर यांनी जयभवानी साखर कारखान्यास ३,२९,०००/-रुपयाचा धनादेश दिला होता. नंतर जयभवानी कारखान्याने सदर धनादेश वटविण्यासाठी बँकेत जमा केला असता आरोपी जालींदर देवकर यांच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्यामुळे सदरचा धनादेश अनादरीत झाला होता. त्यानंतर जयभवानी कारखान्याने आरोपी जालींदर देवकर यांच्या विरुद्ध मा.गेवराई न्यायालयात चलनक्षम दस्तऐवज अधिनियमाचे कलम १३८ अन्वये एस.सी.सी नंबर - २५/२०११ ही केस दाखल केली होती. सदर प्रकरणात आरोपी जालींदर देवकर विरुध्द साक्षीपुराव्यानूसार गुन्हा सिध्द झाल्याने गेवराई न्यायालयातील मा.न्या. एम.पी.एखे मॅडम यांनी आरोपी जालिंदर देवकर यास चलनक्षम दस्तऐवज अधिनियमाचे कलम १३८ अन्वये दोषी धरुन दिनांक २७ फेब्रुवारी २०१९ रोजी सहा महीन्याच्या कारावासाची शिक्षा व धनादेशाचे ३,२९,०००/- रुपये व नुकसान भरपाईचे १०,०००/- असे मिळून ३,३९,०००/- रुपये हे एक महीन्याच्या आत फिर्यादी जयभवानी साखर कारखान्यास देण्याची शिक्षा सुनावली आहे. 
      सदर निकालामुळे खोटे चेक देणाऱ्या आरोपींचे धाबे दणाणले आहेत. सदर प्रकरणात फिर्यादी जयभवानी साखर कारखान्याच्या वतीने गेवराई येथील अॅड. डि. एम. कुलकर्णी, शरद कुलकर्णी यांनी काम पाहीले व सदर प्रकरणात त्यांना अॅड. जयश्री कुलकर्णी, आंबादास कुलकर्णी व अॅड. बी.ई.निकम यांनी सहकार्य केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

1 comment: