तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

गणेश पाटील यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी नियुक्ती

अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय बैठकीत निर्णय
_____________
मोताळा :- (प्रतिनिधी ) अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची राजस्तरीय बैठक अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी प.पूज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन भूमीत घेण्यात आली.यावेळी अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाची महाराष्ट्रातील कार्यकारणीत नव्याने बदल करण्यात आले.
यात आपला गुजरात मराठी दैनिक महाराष्ट्र आवृत्ती प्रमुख गणेश पाटील यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान या बैठकीत महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नरेंद्र कदम,महाराष्ट्र सचिव लक्ष्मण सुर्यवंशी, महाराष्ट्र सल्लागार रवींद्र पवार,जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी भगवान सोनार तसेच,जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी ललित खरे,व हेमंतकुमार चौधरी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या

दरम्यान येणाऱ्या 22 व 23 फेब्रुवारी रोजी गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या पावनभूमित होऊ घातलेल्या अधिवेशन संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी संघटणे कडून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघठणेकडून करण्यात आले.

*या प्रसंगी बैठकीचे संस्थापक अध्यक्ष श्री. मनोहरराव सुने तर प्रमुख उपस्थिती केंद्रीय कार्यध्यक्ष श्री. मधुसूदन कुलथे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. कैलासबापू देशमुख, अशोक पवार, अशोक राठी, युसुफभाई,राजाभाऊ भुरे,संजय कदम , राहुल उके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र मेंढे यांनी केले तर सुत्रसंचालन बाळासाहेब स्वर्गीयकर व आभार अशोक राठी,यांनी मानले*

कार्यक्रम संपल्या नंतर राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज संस्थेचे सचिव  मा.जनार्दन पंत बोथे यांची महाराष्ट्रातुन आलेल्या सर्व पद अधिका-यांनी भेट घेतली व चर्चा केली तर गुरुकुंज मोझरी व राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांच्या जिवन चरीत्र बदल अरविंद राठोड यांनी उपस्थितांना माहिती दिली.

No comments:

Post a Comment