तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 10 February 2019

आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कुलमध्ये वाहतूक सुरक्षा सप्ताह संपन्न.....

गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्ताने कोकमठाण (ता.कोपरगाव) येथील आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कुल( सी.बी.एस.ई. ) येथे उत्साहात साजरा करण्यात आला.  या वेळी विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमा विषयी नाटिका सादरीकरण केले.

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक कुसळकर,हेड कॉन्स्टेबल सुभाष आव्हाड,सूरज पवार हे होते, तर प्रमुख पाहुणे वाहन विभागाचे प्रमुख विश्वास बारवकर,चेअरमन कांतीलाल पटेल,प्रशासकीय अधिकारी सुरेश शिंदे या वेळी उपस्थित होते. या वेळी कुसळकर यांनी वाहतूक नियम व कायदा, सुरक्षा या विषयी मार्गदर्शन केले. 

या वेळी आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कुल चे वाहन वाहक यांचा सत्कार व गौरव करण्यात आला, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व  शिक्षक वृद यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment