तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 February 2019

भव्य मोफत पशुरोग निदान, चिकित्सा व उपचार शिबीराचा लाभ घ्यावा


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी 
सोनपेठ : येथील कै. डॉ प्रभुअप्पा गणपतअप्पा निर्मळे यांच्या प्रथम पुण्यतिथी स्मरणार्थ शनिवार दि. 9 फेब्रुवारी रोजी भव्य मोफत पशुरोग निदान, चिकित्सा व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आ. श्री व्यंकटराव कदम तर उद्घाटक डॉ. एस. सी. खंडाळीकर आहेत. तरी पशुपालकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक संतोष अप्पा निर्मळे यांच्यासह प्राणिशास्त्र विभाग कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ यांच्या वतीने करण्यात आले आहे. हे शिबीराचे पशुवैद्यकीय दवाखाना शेळगाव रोड, सोनपेठ येथे आयोजीत केले आहे.
सोनपेठ परिसरातील पशुपालकांच्या अडचणी लक्षात घेऊन कै. डॉ. प्रभुअप्पा निर्मळे यांच्या पुण्यतिथी स्मरणार्थ भव्य व मोफत पशुरोग निदान, चिकित्सा व उपचार शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरासाठी सहाय्यक आयुक्त एस. सी. खंडाळीकर, लघु पशु सर्वचिकित्सालय अंबाजोगाई, डॉ. एच. पी. बोयाळे, डॉ. तानाजी भोसले, डॉ. झाकिर अली, डॉ. बी. एस. राठोड, डॉ. ए. के. राऊत हे रहाणार आहेत. तरी पशुपालकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक संतोषअप्पा निर्मळे यांनी केले असून पशुपालकांचे हित लक्षात घेऊन व या शिबीरात सहभागी होऊन लाभ घेण्याचे अवाहन प्राणिशास्त्र विभाग कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ यांनी केले आहे. तरी या शिबीराचा लाभ घ्यावा.

No comments:

Post a Comment