तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 10 February 2019

वैजापूरमध्ये सोमवारी शेतकरी मित्र प्रतिष्ठानच्या वतीने भव्य शेतकरी संघर्ष मेळाव्याचे आयोजन......गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

वैजापूर व गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे-शेतमजुरांचे व बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी दि.११फेब्रुवारी२०१९,सोमवार रोजी दुपारी ४ वाजता डेपो रोड, वैजापूर येथे भव्य शेतकरी संघर्ष मेळावा स्पंदन व शेतकरी मित्र प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामुळे मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना वैजापूर व गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांचे नांमकातील हक्काचे पाणी मिळावे व "नांमकाचे आवर्तन १५फेब्रुवारीच्या आत सोडण्यात यावे" या मुख्य मागणीसह पुढील मागण्या या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
नामकाच्या चाऱ्या-पोटचाऱ्यांची कामे तात्काळ पूर्ण करावी,नामकावरील पश्चिम महाराष्ट्राचे आरक्षण उठवावे,वैजापूर व गंगापूर तालुक्यातील१७०गावांचे पिण्याच्या पाण्याचे कायमस्वरूपी आरक्षण नामकावर टाकावे,जायकवाडी जलाशयाच्या बॅक वॉटरवर अवलंबून असलेल्या सर्व गावांचे कायमस्वरूपी आरक्षण प्रकल्पावर टाकण्यात यावे,नामकातून १०%पाणी औद्योगिकी करणासाठी मिळावे,वैजापूरची MIDC चालू करून रोजगार निर्मिती करण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनी शासनाने परत कराव्यात,बेलगाव-नांदगाव-वैजापूर ग्रामीण२-शेटेवस्ती व शेळकेवस्तीसाठी पालखेडच्या डाव्या कालव्यातुन कायमस्वरूपी पाणी मिळावे,पालखेड ओव्हर-फ्लो चे पाणी नारंगी-सारंगीत सोडण्यात यावे,मन्याड प्रकल्पातून जवळपासच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाचा प्रश्न सोडविण्यात यावा, रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यात यावी,इ.प्रकारच्या तालुक्यातील सर्व पाण्याचा समस्या या मेळाव्याच्या माध्यमातून प्रशादनासमोर मांडण्यात येणार आहेत.

मराठवाड्याचा टँकरवाडा झालेला असताना शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या जाणून घेवुन त्यावर मार्ग काढण्यासाठी हा मेळावा घेण्यात येत असल्याचे या मेळाव्याचे आयोजक तथा शेतकरी मित्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ.राजीव डोंगरे यांनी सांगितले.
वैजापुर व गंगापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आवर्जून या मेळाव्यात सहभागी व्हावे असे शेतकरी मित्र प्रतिष्ठाणच्या वतीने आवाहन करण्यात आले.

No comments:

Post a Comment