तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत साखळी आमरण उपोषण


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १२ __ कासारवाडी ते सावळेश्वर पर्यंत २९ किलोमीटर असणारी अमृतानदी जलयुक्त शिवारमध्ये आलेली असून याचे राहिलेल्या अर्धवट काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत व साखळी आमरण उपोषण मच्छिंद्र गावडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे.
      खडक वडगाव, चापडगाव, ठाकुर पिंपळगाव, बोधेगाव, केदारेश्वर कारखाना, लाडजळगाव, चकलांबा, बाडगव्हाण, बालमटाकळी, सुकळी, पिंपळगाव, रसुलाबाद, तरडगव्हाण, शेकटा, शिवरवाडी, पवळाचीवाडी, मांडूळ, खळेगाव दादे, दादे वाडी, मारुतीची वाडी, उमापुर, बोरी पिंपळगाव भोजगाव गव्हाण बंगाली पिंपळा चकलांबा फाटा, धुमेगाव, पिंपरी, देशपांडे पिंपरी, बालमटाकळी, माटेगाव, आंतरवाली, जळगाव, देवपिंपरी, थडी, राजपिंपरी, कोमलवाडी, पांढरवाडी, खोपटी, मन्यारवाडी, वडगाव ढोक, गढी, सिरसदेवी मार्गे सिंदफणा तलावापर्यंत केरळचा उपकँनाल होण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने ज्येष्ठ नेते मच्छिंद्र गावडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत साखळी आमरण उपोषण होत आहे.
        शुक्रवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता चकलांबा सर्कल तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयासमोर गेवराई तालुक्यातील चकलांबा या ठिकाणी शेतकऱ्यांनी आमरण उपोषणास उपस्थित राहवे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment