तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 31 March 2019

ताडकळस येथे राजेशदादा विटेकर यांचा प्रचाराचा मंगळवारी नारळ फोडणार


-----------------------------------------------
परभणी लोकसभेचे आघाडी व मित्र पक्षाचे आपले लाडके लोकप्रिय ऊमेदवार राजेशदादा विटेकर यांचा प्रचाराचा ताडकळस येथे 2 एप्रिल मंगळवार रोजी सकाळी 8 वाजता हानुमान मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तरी ताडकळस येथील सर्व आघाडी व मित्र पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, व मतदार बंधुनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  ताडकळस येथील आघाडी व मित्र पक्षाच्या सर्व कार्यांकर्तानी केले आहे.

परळीत सोमवार पासून आघाडीच्या नेत्यांचा संयुक्त प्रचार दौरा


बजरंगबप्पांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे, टी.पी.मुंडे व संजय दौंड यांचा परळी तालुक्यात संयुक्त प्रचार दौरा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.31...............बीड लोकसभा आघाडीचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांच्या प्रचारार्थ उद्या दि.01 एप्रिल रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस टी.पी.मुंडे, व कॉंग्रेसचे युवक नेते संजय दौंड हे संयुक्त प्रचार दौरा करणार आहेत.

सकाळी 08 वा दाऊतपूर, 09 वा संगम, 10 वा वागबेट, 11 वा ब्रम्हवाडी, दुपारी 12 वा इंदपवाडी, 01 वा जिरेवाडी, 04 वा तळेगांव, सायंकाळी 05 वा टोकवाडी, 06 वा भोपला, 07 वा कन्हेरवाडी आदी ठिकाणी बैठका घेणार आहेत.

या दौर्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे प्रचार संपर्क कार्यालयातून कळवण्यात आले आहे.

टोकवाडी पंचायत समिती गणातील गावात डाँ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ काँर्नर बैठकीचे आयोजन ;मोठ्या संख्येने उपस्थित रहा-रोहित (आबा) मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना - रासप - रिपाई महायुतीच्या उमेदवार डाॅ. प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ सोमवार दि.01 एप्रिल 2019 रोजी पासुन परळी तालुक्यातील टोकवाडी पंचायत समिती गणातील सर्व गावात काँर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती टोकवाडी येथील भाजपाचे युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तथा युवा नेते रोहित (आबा) मुंडे यांनी दिली. 

लोकसभेच्या उमेदवार खा.डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ टोकवाडी पंचायत समिती गणातील सर्व गावानमध्ये काँर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पुन्हा एकदा विक्रम घडवुया, प्रितमताईना खासदार बनवुया या मोहीमे खाली काँर्नर बैठकांचे होणार आहे.  या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील अनेक नेते मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहाणार आहेत. तसेच  बैठकीचे सोमवार दि.01 ते गुरुवार दि.04 पर्यंत चालणार आहेत.  खालील प्रमाणे सोमवार दि.०१.०४.२०१९ सायंकाळी ७:०० वाजता मौजे इंदपवाडी , रात्री ८:०० वाजता दाऊतपुर, दुसरा दिवस  मंगळवार
दिनांक ०२.०४.२०१९ सायंकाळी ७:०० वाजता तळेगाव, रात्री ८:०० वाजता ब्रह्यवाडी, तिसरा दिवस  बुधवार  दिनांक ०३.०४.२०१९ सायंकाळी ७:०० विचार वाजता संगम, रात्री ८:०० वाजता वागबेट आणि गुरुवार
दिनांक ०४.०४.२०१९ सायंकाळी ७:०० वाजता टोकवाडी आदी ठिकाणी काँर्नर बैठकीचे आयोजन केले आहे. चला पुन्हा एकदा विक्रम घडवुया, प्रितमताईंना खासदार बनवुया या मोहीमे खाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यकर्त्यांनी व मतदारांनी उपस्थित रहावे ही विनंती सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टी टोकवाडी पंचायत समिती गणातील सर्व पदाधिकारी तसेच टोकवाडी येथील भाजपाचे युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तथा युवा नेते रोहित (आबा) मुंडे यांनी दिली.

जातपात न बघता बीड जिल्हयाची झोळी विकासाने भरली - ना. पंकजाताई मुंडे
डझनभर आमदार देणा-या राष्ट्रवादीला मात्र विकासाशी कांहीही देणेघेणे नाही

देवडीतील सभेला अभूतपूर्व प्रतिसाद ; ग्रामस्थांनी केले जोरदार स्वागत 

बीड (प्रतिनिधी) :- दि. ३१ ---- बीड जिल्हयाच्या राजकारणात आमचे नाते मातीशी आणि माणसांशी आहे. विकास करताना मी भगवा, हिरवा, निळा, पिवळा असा भेद केला नाही. जाती-पातीच्या आधारवर निधीचे वाटप केले नाही. सामान्य माणूस हिच माझी जात आहे,  मला फक्त महिला व पुुरुष या दोनच जाती माहित आहेत. विरोधक माझ्यावर गुंडगिरीचा आरोप करत असले तरी मी केवळ विकासासाठीच राजकारण करत असून निवडणुकीनंतर देशात पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार त्यासाठी बीड जिल्हयातील सर्वसामान्य जनतेचा आशिर्वाद आम्हाला हवा आहे. माझी बहिण मी तुमच्या ओटीत टाकते, तिला आशिर्वाद द्या असे म्हणत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी देवडीची सभा जिंकली. दरम्यान माझ्या बहिणीने वडीलांचे नांव लावले तर तुमचे काय बिघडले असा  सवाल त्यांनी केला. 

बीड लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना-रिपाई-रासपा- रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारात देवडी ता.माजलगांव येथे आयोजित केलेल्या सभेत त्या बोलत होत्या. 

   प्रचंड जनसमुदायासमोर बोलताना पंकजाताई म्हणाल्या की, मला आशिर्वाद देण्यासाठी महिला एवढया संख्येने येतात हे पाहून माझा उत्साह वाढतो. पाच वर्षात जिल्हयात काम करतांना विकासाच्या प्रश्नाशिवाय मी सुतभर बाजुला गेले नाही. आणि विकासनिधी देताना मी जातीपातीचे राजकारण न करता माझी माणसं माझा जिल्हा हे सुत्र डोळयासमोर ठेवले. ग्रामीण भागातील गोरगरीबांच्या कल्याणासाठी रस्त्यांची कामे केली, राष्ट्रीय महामार्ग मंजुर केले, मुलभुत गरजांना प्राधन्य देतांना प्रितमताईंनी बीड नगर परळी रेल्वेचा प्रश्न मार्गी लावून दाखवला. गाव तेथे कोटीच्या घरात योजना मी आणल्या आहेत. आम्ही भगिंनीनी अगोदर काम करून दाखवले मग पुन्हा मतदान मागतो. विरोधकांना आमच्या विरोधात बोलण्यासाठी विकासाच्या प्रश्नावर मुद्दाच नाही ? परिणामी जातीपातीचा आधार घेवून निवडणुक वेगळया वळणावर घेवून जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

पाच वर्षात काम करतांना गुंडगिरी, दादागिरी हे शब्दही कधी मला शिवले नाहीत. माझी भुमिका, माझे काम, लोकांनी पाहिलेले आहे. यावरही बोलाताना त्या म्हणाल्या की, बीड जिल्हयात जातीपात कधीच झाला नाही ज्या जिल्हयाने स्व.क्रांतीसिंह नाना पाटील, स्व.गंगाधर आप्पा बुरांडे, स्व.केशरकाकू क्षीरसागर, स्व.गोपीनाथरावजी मुंडे अशी माणसे खासदार म्हणून निवडून दिेले. त्यामुळे जिल्हयाच्या राजकीय संस्कृतीला जातीपातीचा रंग कधीच नाही. या निवडणुकीसाठी प्रितमताईंच्या रुपाने उच्चविद्याभुषित उमेदवार आपल्या डोळयासमोर आहे त्यांनी केलेले काम आपण सर्वानी पाहिलेले आहे. पात्र कोण अपात्र कोण हे आपण ठरवा. मी माझी बहिण आपल्या ओटित टाकत असून तिला सुजान मतदारांनी आशिर्वाद दयावेत असे आवाहन त्यांनी केले. 

बाळा जिवाला सांभाळ...ज्येष्ठांचा मिळाला आशीर्वाद
-----------------------------
देवडीत कार्यक्रमाच्या स्टेजवर ना.पंकजाताई यांचे आगमन झाले तेव्हा ८९ वर्षाचे एक वयोवृद्ध ज्येष्ठ व्यक्ती  स्टेजवर आला आणि मंत्री महोदयाच्या डोक्यावर हात ठेवून ते म्हणाले 'बाळ जिवाला सांभाळ'  हा प्रसंग पाहून सद्गतीत झालेल्या पंकजाताईंनी जाहिरपणे बोलताना सांगितले की, मला वृध्द आजोबांच्या रुपात माझे बाबाच दिसले. कारण मी सभेला बाहेर पडतानाही गोपीनाथगडावर जावून बाबांच्या समाधीला नतमस्तक होते. त्याच क्षणी जणू काही मला त्यांचे मार्गदर्शनाचे धडेच मिळाले असा भास होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

  या सभेत ना.महादेव जानकर, आ.आर.टी.देशमुख, केशवदादा आंधळे, मोहन जगताप, रमेश आडसकर, राजाभाऊ मुंडे आदिंची भाषणे झाली. तर व्यासपीठावर रासपा नेते बाळासाहेब दौडतले, सभापती दिनकर आंधळे, तालुकाध्यक्ष राम पाटील, नितीन नाईकनवरे, अरुण राऊत, श्री उजगरे, बाबरी मुंडे, संजय आंधळे आदि मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक मच्छिद्र झाटे यांनी तर सचंलन सुग्रीव मुंडे यांनी केले. या सभेला दहा हजाराहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता.

खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना शहरातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार

पद्मावती गल्लीसह शहराच्या विविध भागात प्रचार फेरी, मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. ३१... 
    खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर परळीकरांची मान उंचावेल असे काम केले आहे त्यामुळे यावेळी परळी शहरातुन मागच्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्य देणार असल्याचा शब्द मतदारांनी दिला. पद्मावती गल्ली आणि शहराच्या विविध भागातून काढण्यात आलेल्या प्रचार फेर्‍यांना भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जाऊन डॉ. प्रितमताई मुंडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. 
      आज रविवारी सकाळी शहराच्या पद्मावती गल्लीमध्ये भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रूक्मीणींची पुजा करण्यात आली. श्रीफळ वाढवून फेरीला सुरुवात करण्यात आली. ना. पंकजाताई मुंडे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, येऊन येऊन येणार कोण, प्रितमताईंशिवाय दुसरे कोण अशी जोरदार घोषणाबाजी करीत घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांनी प्रचार केला. या फेरीत भाजपा जेष्ठ नेते दत्तापा ईटके, डाॅ. हरीश्चंद्र वंगे,  शांतीलाल जैन, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, चंद्रकांत समशेट्टे, अरुण टाक, चैनसुख जाजु, विठ्ठलअप्पा चौधरी, वैजनाथ ताटीपामल, डाॅ. शालीनीताई कराड, डाॅ. दे.घ.मुंडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भाऊराव भोयटे, गुलाबअप्पा शेटे, अशोक भातांब्रेकर, विजयसेठ वाकेकर, प्रकाश जोशी, रमेश भोयटे, बंडुसेठ टाक, अतुल दुबे, रमेश चौंडे, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, राजेंद्र ओझा, अॅड. मिर्झा अली, राहुल टाक,  राहुल केंद्रे, पि.टी. मुंडे, सुनिल चिकाटे, नरेश पिंपळे, धनराज कुरील, बाळु शहाने, मोहन जोशी, नितीन समशेट्टी, पवन मोदाणी, सचीन गित्ते, प्रितेष तोतला, अनिष अग्रवाल, अमोल डुबे, श्रीनिवास राऊत, राजेश ताटीपामल, रवि टाक, प्रमोद दहिवाळ, निलेश राका, विजयकुमार खोसे, अश्विन मोगरकर, सुनिल कांबळे, सय्यद शेरु, बंडुनाना कोरे, संजय देवकर, सोमनाथ वाघमारे, सचिन गिराम, संतोष हाळणे, रोहन क्षिरसागर, गणेश कराड, दत्ता सोळुंके, प्रवीण सत्ताळे, सोमनाथ खोसे, बाळू कुरे, उत्तरेश्वर बहिरे,भगवत मोरे, नाना कदम, सुदीप गोपणपाले, सचिन झिरपे, राम शिंदे, संतोष सोनवणे, करण कदम, वेंकेटेश कुंभार, ऋषी बिडगर,दिनेश अंधारे, माऊली मोरे, हनुमान राऊत, यश बिडगर, श्रीनाथ राऊत, नितीन गिराम आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
   
माणिकनगर, जिव्हेश्वर नगरमध्ये रॅली

    भारतीय जनता पार्टी ,शिवसेना,रिपाई,रासप रयत     क्रांती सेनेच्या बीड़ लोकसभेच्या उमेदवार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ  माणिकनगर, जिव्हेश्वर नगरमध्ये हनुमान मंदिर येथे  श्रीफळ वाढवून आज सकाळी 8 वा  गाठी भेटी घेऊन मतदारांनशी सवांद साधला. यावेळी नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शक्ती केंद्रप्रमुख राजभाऊ दहिवाळ, विठ्ठल दंदे, नगरसेवक प्रा,पवन मुंडे, सुशीलाताई फड, शिवसेना उपशहर प्रमुख अभिजित धाकपडे, शिवसेना युवा तालुका प्रमुख अमर टाकळकर,भाजपा युवा नेते योगेश पांडकर, भाजपा सोशल मिडीया सेलचे विजयकुमार खोसे, वैजनाथ रेकणे, विजय दहिवाळ, सुधाकर खोकले, विकास गायकवाड, राहुल फड, शिवा दंदे,पंकज मुंडे, रमेश मुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सिमुरगव्हाण गव्हाण येथिल जायकवाडी वसाहत भागात आग
प्रतिनिधी
पाथरी:-तालुक्यातील सिमुरगव्हाण येथिल जायकवाडी परिसरातील मोकळ्या जागेतील गवताला रविवारी दुपारी आग लागली ही आग पाथरी अग्निशमन दलाच्या जवनांनी आटोक्यात आणली.
रविवारी शेतक-याने  उसाची पाचट पेटऊन दिल्याने ही आग लागल्याचे समजते. आग पसरत असल्याची माहिती मिळताच पाथरीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले या वेळी अग्निशमन दलाचे खुर्रम खान, शरिफ खान, निलेश वाडेकर ,बळीराम गवळी यांनी आग आटोक्यात आणली या वेळी येथिल विज वितरण चे रोहीत्र वाचवण्याो या पथकाला यश आले

संत विचारानेच शाश्वत सुख मिळते -ह.भ.प.ॲड.दत्ता महाराज आंधळे

पुणे  (प्रतिनिधी) :- संतांच्या विचार अंगीकृत केल्यास मानवी जीवन स्थिर होऊन शाश्वत सुख संत विचारानेच मिळते असे प्रतिपादन ह.भ.प.ॲड.दत्ता महाराज आंधळे यांनी केले.
         पिंपरी ता.मावळ जि.पुणे येथिल वर्र्सुबाई माता मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तनसेवा करताना ,"काय सांगो आता संतांचे उपकार/मज निरंतर जागविती//"या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करताना साहित्यिक तथा संतवाङमयाचे संशोधक असलेले  ह.भ.प.दत्ता महाराज म्हणाले की,संतांचे जीवावर,समाजावर आणि अखिल विश्वावर अनंत उपकार आहेत .संत हे मानवी जीवाला निरतंर जागविती  ,शिकविती व सांभाळीती म्हणून त्यांचे ऋण या जगावर आहे .संत वाङमयातून संतांनी मानव कल्याण  व शाश्वत सुखाचा ,चिरंतन सुखाचा मार्ग सांगितलेला आहे .
यावेळी माळेगाव  पंचक्रोशीतील भजनीमंडळ तसेच ह.भ.प.गजानन गोरे महाराज ,ह.भ.प.मनोहर भालके, ह.भ.प.शंकरराव सुपे,मृदंगाचार्य ह.भ.प रविंद्र मोरमारे,सरपंच राजेशजी कोकाटे,धडाडीचे कार्येकर्ते व आदर्श सरपंच  श्री बाळासाहेब खंडागळे आणि श्री बाळासाहेब घाडगे,ठाकर व ह.भ.प.प्रमिलाताई भालके तसेच असंख्य भाविक   उपस्थित होते .

डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी राजेश गिते डोअर टू डोअर जाऊन गाठीभेटी
विकासाच्या मुद्यावरून प्रितमताईचा विजय निश्चित-राजेश गित्ते

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
बीड लोकसभा भाजपा-  शिवसेना- रिपाई- रासप महायुतीच्या अधिकृत उमेदवार खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ जोरदार आघाडी घेतली आहे. भाजपा युवा नेते राजेश गित्ते यांनी परळी मतदारसंघ पिंजुन काढला असुन 
त्यांनी मतदार संघातील अनेक गावांना भेटी दिल्या.  त्यांनी घेतलेल्या काँर्नर बैठकीस उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे.
सकाळ पासुन ते रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांच्या भेटी घेऊन संवाद साधत आहेत. कडक उन्हाच्या तीव्र ते 
 राजेश गित्ते डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी डोअर टू डोअर जाऊन गाठीभेटी ह़ोत आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघात निवडणूक वारे वेगाने वहायला सुरुवात झाली आहे. विद्यमान खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. काँर्नर बैठकीत बोलतांना गित्ते म्हणाले की,   लोकसभा निवडणूक विकासाच्या मुद्यावर आहे. राज्याच्या ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे, विद्यमान खासदार प्रितमताई  यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात कधी नाही तेवढे विकासाची कामे झाले आहेत त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी  भाजपाच्या लोकसभा उमेदवार डॉ प्रितमताई मुंडे यांना मतदार बहुमताने निवडून देतील. असा ठाम विश्वास त्यांनी व्यकत केला. तसेच  येणाऱ्या काळातही अशीच कामे होतील हा ठाम विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. हा विश्वास सार्थ ठरवायचा असेल तर खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्याशिवाय पर्याय नाही असा निश्चय जनतेने केल्याचे चित्र ग्रामीण भागात निर्माण झाले आहे. 

आज वडगाव दादाहारी जिल्हा परिषद गटात दगडवाडी,लोणारवाडी, कासारवाडी येथे भारतीय जनता पार्टी शिवसेना व मित्र पक्षाच्या लोकसभे च्या  अधिकृत उमेदवार खा डॉ प्रीतम ताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ भाजपा जेष्ठ नेते नामदेवराव आघाव दादा,भाजपा युवा नेते राजेश गिते यांनी काँर्नर बैठका घेतल्या  या गावातुन व गटातून परळी वैजनाथ तालुक्यात सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी आपण सर्व जण मिळुन एक दिलाने काम करून ताई साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून आणु असा निर्धार केला या बैठकीस  माजी पंचायत समिती सभापती प्रभाकर दादा फड, मा जिल्हा परिषद सदस्य रमेश मुंडे , भाजपा जेष्ठ नेते दिलीप आबा बिडगर, मा प स  मारोतराव फड , भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी शिंदे पाटील स सदस्य भरत सोनवणे, वडगाव सरपंच बजरंग कुकर, लोणारवाडी सरपंच नवनाथ मुंडे ,सेलु सरपंच गंगाधर सातपुते ,, कासारवाडी मा सरपंच दशरथ दादा गुट्टे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यामुळे स्वा. रा. ती. रूग्णालयाला नवसंजीवनीकरोडो रुपयांचा निधी दिल्याने रुग्णालयाचा कायापालट - प्रशांत आदनाक

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- दि. ३०.....
    खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यामुळे अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाला नवसंजीवनी मिळाली आहे. परंतु विरोधकांना त्यांनी केलेली कामे दिसत नाहीत हेच दुर्दैव आहे, विरोधकांनी त्यांनी केलेली कामे एकदा पाहुन घेण्याची गरज असल्याची जळजळीत टीका करून खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी करोडो रुपयांचा निधी देऊन रूग्णालयाचा कायापालट केला असल्याचे स्वा. रा. ती. अभ्यागत मंडळाचे सदस्य प्रशांत आदनाक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
      अंबाजोगाई रूग्णालयाची दुरावस्था असल्याचे विरोधकांकडून जाणीवपूर्वक सांगितले जात आहे. त्यावर प्रशांत आदनाक यांनी सडकून टीका करून डॉ. प्रितमताई मुंडे यांनी रूग्णालयात केलेल्या सुधारणांचा तपशीलच दिला आहे. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांनी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएसच्या ५० वाढीव जागांना अंतिम मान्यता मिळाली, रुग्णालयाच्या  ओपीडी विभागाची अत्याधुनिक व सुसज्ज इमारत बांधण्यासाठी ६५ कोटींचा निधी दिला, आज ही नवीन ओपीडी इमारत रुग्णांच्या सेवेत उभी आहे. तसेच रुग्णालय परिसरात मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह उभारण्याचे कामही सुरु आहे. स्वा.रा.ती. रुग्णालय परिसरात नवीन सर्जिकल बिल्डिंग, लायब्ररीसह धर्मशाळा, रुग्णांसाठी निवारा कक्ष, वार्ड आरओ वॉटरची सुविधा असे रुग्णांना दिलासा देणारे काम खा. प्रितमताई मुंडे यांनी केले असल्याचे आदनाक यांनी सांगितले.
     रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून गेल्या साडेचार वर्षात एकूण चाळीस कोटी रुपये किंमतीची नवीन अत्याधुनिक यंत्रसामुग्री खा.प्रितमताईनी उपलब्ध करून दिली आहे. सोनोग्राफी विभाग , अस्थिरोग विभाग यात नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात व एमडी-एमएस च्या जागा वाढवण्यात खा.प्रितमताई मुंडे यांनी केलेला यशस्वी पाठपुरावा उपयोगी आल्याचे प्रशांत आदनाक यांनी सांगितले. यासह अनेक कामे डॉ. प्रितमताईंच्या माध्यमातून सुरू आहेत. ही कामे विरोधकांना दिसत नाहीत, अशा विरोधकांनी मुंडे भगिनींनी केलेली विकास कामे पाहून घेण्याची गरज असल्याचेही आदनाक म्हणाले. जनतेने विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी परचुंडी येथे , प्रचार फेरीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि..30 मार्च रोजी
     बीडच्या खासदार आणि परळीच्या कन्या डॉ. प्रितमताई मुंडे यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने संसदेत पाठविण्यासाठी परचुंडी येथे प्रचार फेरी काढण्यात आली त्याप्रसंगी ज्येष्ठ नेते माऊली मुंडे भीमराव मुंडे तालुका उपाध्यक्ष फुलचंद मुंडे संचालक व्यंकटराव कराड सोबत परचुंडी गावातील भिमाशंकर नावंदे लक्ष्मणआप्पा नावंदे मोतीराम गडदे लक्ष्मण खोडवे दत्तू सराडे वसंत नावंदे विसुअप्पा पत्रवळे राम सरांडे ग्राम पंचायत सदस्य बालू रुपनर कुंडलिक पत्रवाळे अर्जुन सरांडे गणेश सरांडे अणणा मदने दिगांबरअप्पा नावंदे आदि नागरिकानी रॅलीमध्ये सहभागी होऊन डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या प्रचार फेऱ्यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी  डॉ. प्रितमताई मुंडे यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने विजयी करुण लोकसभेत पाठवू असा गावातील नागरिकांनी निर्धार केला यावेळी  गावातील नागरिक  व कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते

बारावी मधील गुणवंत कामगार पाल्याचा पाच हजार रुपये देऊन गौरव कामगार कल्याण मंडळाचा  उपक्रम 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी बारावी मध्ये विशेष गुण संपादन करणाऱ्या कामगार पाल्यांचा   विशेष गौरव करण्यात येतो.
 यावर्षी परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यांमधील कामगार सुभाष कोरे यांचा पाल्य धनराज कोरे यांनी इयत्ता बारावी मध्ये ९६.१० टक्के गुण मिळविल्याबद्दल कामगार कल्याण मंडळातर्फे नुकतेच लातूर येथे पाच हजार रुपयाचे पारितोषिक देऊन त्याचा  सत्कार करण्यात आला.  धनराज कोरे यांची गुणवंत विद्यार्थी म्हणून निवड झाल्याबद्दल परळी येथील कामगार कल्याण केंद्राच्या वतीने धनराज कोरे व त्यांच्या  पालकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्र संचालक आरेफ शेख,  उमा ताटे उपस्थित होते. 
 कामगार कल्याण मंडळातर्फे नेहमीच कामगार व कामगार पाल्यांना विशेष प्रोत्साहन देण्यात येते. बारावी मध्ये विशेष गुण संपादन केल्याबद्दल कामगार कल्याण मंडळाच्या वतीने धनराज कोरे यांचा सत्कार करण्यात आले.

परभणीत नगरसेवकाची हत्या;,आरोपी स्वत: होऊन पोलीसात हजरप्रतिनिधी
परभणी : परभणीत किरकोळ कारणावरुन शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरदीप रोडे असं हत्या झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे. परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेतील दोन आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
अमरदीप यांच्यावर किरकोळ वादातून त्यांच्याच दोन सहकाऱ्यांनी हल्ला केला. रविवारी सकाळची ही घटना आहे. रवी गायकवाड आणि किरण ढाके अशी आरोपींची नावं आहेत. अमरदीप यांची हत्या केल्यानंतर आरोपी रवी गायकवाड आणि किरण ढाके हे थेट पोलीस स्टेशनला हजर झाले. हत्येचं नेमंक कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अमरदीप यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमला असून शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

परभणीत नगरसेवकाची हत्या;,आरोपी स्वत: होऊन पोलीसात हजरप्रतिनिधी
परभणी : परभणीत किरकोळ कारणावरुन शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरदीप रोडे असं हत्या झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे. परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेतील दोन आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
अमरदीप यांच्यावर किरकोळ वादातून त्यांच्याच दोन सहकाऱ्यांनी हल्ला केला. रविवारी सकाळची ही घटना आहे. रवी गायकवाड आणि किरण ढाके अशी आरोपींची नावं आहेत. अमरदीप यांची हत्या केल्यानंतर आरोपी रवी गायकवाड आणि किरण ढाके हे थेट पोलीस स्टेशनला हजर झाले. हत्येचं नेमंक कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अमरदीप यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमला असून शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Saturday, 30 March 2019

जिंतूर: लोकसभा निवडणूकी साठी आडगाव बाजारात मतदानाच प्रात्यक्षिकजिंतूर
आठवडी बाजारात EVM/VVPAT जनजागृती :
आज दिनांक ३०/०३/२०१९रोजी आडगाव बा.येथे मतदान प्रात्यक्षिक करून मतदाराची जनजागृती करण्यात आली. 
मा.भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार व मा, जिल्हाधिकारी  पी.शिवशंकर,सह.निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, उप. जिल्हाधिकारी निवडणूक महादेव किरवले, जिंतुरचे तहसिलदार सुरेश शेजूळ  यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतुर तालुक्यात EVM /VVPAT जनजागृतीचा दुसरा टप्पा चालू आहे. 
आज या पथकाने आडगाव बा.येथील आठवडी बाजारात जाऊन तेथे मतदानाचे प्रात्यक्षिक दाखविले. या कार्यक्रमास आठवडी बाजारात परिसरातील अनेक इतर गावातील मतदारांनी मतदान करून मतदानाची खात्री करून घेतली व मतदानाच्या पारदर्शकतेबाबत समाधान व्यक्त केले.
या पथकात सोपान खताळ, अशोक मुलगीर, श्रीकांत दायमा, गणेश ठिगळ, पोलिस कर्मचारी गजानन रोकडे, छायाचित्रकार लहू चांदणे, रामभाऊ घनवट यांचा समावेश आहे. 
या पथकामार्फत आतापर्यंत प्रभावी जनजागृती केली असून प्रत्येक मतदान केंद्रावर  ,गावोगावी, धार्मिक कार्यक्रमात,आठवडी बाजारात जनजागृती करण्यासाठी मतदानाचे प्रात्यक्षिक घेऊन जनजागृती करण्यात आली.

हिवरखेडा येथे शॉट सर्किट मुळे शेतकऱ्यांची वैरण व गुटार जळून खाक जाले

साखरा.प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील शेतकरी मदन बळीराम डाखुरे हे गावच्या बाहेर शेतात राहतात व घराच्या बाजूला त्यानी सहा गाड्या गवत व सहा गाड्या कूटार जमा करून ठेवले होते दि 27/3/रोजी दुपारी 1 च्या सुमारास त्याच्या वैरनी च्या बाजूला महावितरण चे रोहीत्र होते अचानक डी ओ मधून टिलक्ग्य पडून जोरात वारे होते काही तारंाचि स्पर्किक जाली व त्याचे गवत व कूटार पूर्ण पणे जळू लागले हे गावकऱ्याणा समताच गावकऱ्यानी हि आग वीजवन्याच्या प्रयत्न केला पण मोटर लाऊन पानी सोडले पण पूर्ण आग वीजवली अन्यता त्याच्या राहत्या घराला पण आग लागत होती थोड्या वरून अनर्थ ठळला अन्याथा घराला पण आग लागत होती शेतकरी मदन बळीराम डाखुरे यांच्या कडे दिन बैल एक महिस आणि दोन गाय आहेत आत्ता त्याच्या समोर मोठा प्रश्न निर्माण जाला आहे की आत्ता या गुरांनाही काय खाऊ घालू त्याणा तर दुष्काळात तेराव्या महीन असे जा आहे  त्याचे अंदाजे 15//ते 20 हजार रुपयाचे नुकसान जाले आहे त्याचे असे मनने आहे की महावितरण च्या या ताराची स्पर्किग मुळे माजे नुकसान जाले आहे त्या मुळे महावितरण ने नुकसान भरपाई द्यावि अशी मागणी मदन बळीराम डाखुरे हे करीत आहेत 


प्रतिक्रिया 

माज्या कडे आत्ता दोन बैल व एक महीस व दोन गाय आहेत त्याच्या साठी आत्ता चारा कुटुन आणावा हा मोठा प्रश्न निर्माण जाला आहे आणि जे माजे  नुकसान जाले त्याला महावितरण चे अधिकारी जवाब दार आहेत माज्या घरच्या बाजूला डी पी आहे त्या डी पी चा डी ओ मधे जाळ जाला आणि माजी सहा गाड्या गवत आणि सहा गाड्या कूटार जळून पूर्ण पणे खाक जाले आहे शेतकरी मदन बळीराम डाखुरे यानी तेज न्यूज़ शि बोलतांना सांगितले 


तेज न्यूज़ हेडलाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी 
साखरा.प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

शिवशक्ती आश्रम तुपेवाडी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने श्रीक्षेत्र पैठण येथे अन्नदान व स्वच्छता अभियान संपन्न
बालाजी फुकटे हिवरा राळा

बदनापूर तालुक्यातील शिवशक्ती आश्रम तुपेवाडी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने श्रीक्षेत्र पैठण येथे अन्नदान व संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वच्छता राबवण्यात आले असून यामध्ये पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी तसेच पैठण नगरीत दाखल झालेल्या दिंड्या मधील वारकरी मंडळ यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन स्वच्छता अभियान यामध्ये संस्थानचे अध्यक्ष परमपूज्य भारती देवाबाबा भारती रंगनाथ मगर रामुकाका कुमकर बालू देवा अण्णासाहेब कदम कारभारी जगताप काशिनाथ नगर कृष्णा मडके गणेश मोरे ज्ञानेश्वर मोरे भगवानराव पिंपळे भरत महाराज रामेश्वर बुजाडे रामचंद्र मोरे गोविंदराव निलक कल्याणराव मडके भगवानराव मगर यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

पाथरी विधानसभा मतदार संघातील कार्यालयीन प्रमुखांची उपविभागिय अधिकारी यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न


प्रतिनिधी
पाथरी:-परभणी लोकसभा मतदार संघाचे निवडणुक निरिक्षक यांच्या अध्यक्षते खाली परभणी येथील जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात २८ मार्च रोजी  आयोजित केलेल्या बैठकीतील सुचनांची माहिती देण्या साठी शनिवार ३० मार्च रोजी पाथरी येथील तहसिल कार्यालयात उपविभागिय अधिकारी तथा सहायक निवडणुा निर्णय अधिकारी  ९८-पाथरी विधानसभा  मतदार संघ व्हि एल कोळी यांच्या अध्यक्षते खाली येथिल तहसिल कार्यालयात पाथरी,मानवत,परभणी,सोनपेठ येथिल विभाग प्रमुख/अधिकारी  यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकी साठी पाथरी च्या तहसिलदार भाग्यश्री देशमुख, मानवत चे तहसिलदार डी डी फुपाटे, सोनपेठचे तहसिलदार आशिषकुमार बिरादार, सेलूचे उपविभागिय पोलीस अधिकारी पाथरीचे गटविकास अधिकारी बालासाहेब बायस, मानवत चे ज्ञानप्रकाश घुगे, पाथरी न प चे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, मानवतचे उमेश ढाकणे ,सोनपेठचे मुख्याधिकारी देविदास जाधव, पाथरीचे पोलिस निरीक्षक दिपक शिंदे, मानवतचे रमेश स्वामी, मानवतचे एकात्मिक बालविकास अधिकारी एस जी गडदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ के पी चौधरी, डॉ ए बी रावरेकर, डॉ एस एन वाघ, डॉ बी आर टेंगसे, डॉ दगडू, डॉ एस पी पवार, डॉ एस पी देशमुख,मरा वि म कंपनी उपविभागिय उपकार्यकारी अभियंता व्हि एम मठपती, सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाथरीच्या उपविभागिय अभियंत्या एम व्ही मुदिराज, गट शिक्षणाधिकारी प्रतिनिधी जी एस कोटलवार , एम बी गायकवाड, व्हि व्हि घोगरे, एस पी किटे, पी एम तांबोळी यांची या वेळी उपस्थिती होती.या वेळी सोनपेठ चे तहसिलदार आशिषकुमार बिरादार यांनी सर्व विभाग प्रमुख अधिकारी यांचे स्वागत करून २८ मार्च रोजी परभणी येथील बैठकीत निवडणुक निरिक्षकांनी सहायक निवडणुक विषयक सुचनां ची माहिती ची पुर्तता करण्या बाबत आयोजित केल्याचे सांगुन निवडणुकी संदर्भात करावयाच्या कामा बाबत विभाग निहाय आढावा घेण्यात आला.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एक उमेदवारी अर्ज मागे


12 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

बुलडाणा, दि. 29 :- लोकसभा निवडणूक – 2019 साठी जिल्ह्यात 15 उमेदवारांनी 23 अर्ज दाखल केले.  छाननीमध्ये 2 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. छाननीअंती 13 उमेदवार होते. आज अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी दादाराव बन्सी गायकवाड (अपक्ष) यांनी आपला उमदेवारी अर्ज मागे घेतला. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बुलडाणा लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात 12 उमेदवार आहेत.

   या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. बुलडाणा लोकसभेच्या निवडणूकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार :  अब्दुल हफीज अब्दुल अजीज (बहुजन समाज पार्टी), प्रतापराव गणपतराव जाधव (शिवसेना), डॉ राजेंद्र भास्करराव शिंगणे  (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रताप पंढरीनाथ पाटील (बहुजन मुक्ती पार्टी), बळीराम भगवान सिरस्कार (वंचित बहुजन आघाडी), अनंता दत्ता पुरी (अपक्ष), गजानन उत्तम शांताबाई (अपक्ष), दिनकर तुकाराम संबारे (अपक्ष), प्रविण श्रीराम मोरे (अपक्ष), वामनराव गणपतराव आखरे (अपक्ष), भाई विकास प्रकाश नांदवे (अपक्ष) आणि विजय बनवारीलाल मसानी (अपक्ष).

परभणी लोकसभा: निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार सिंग सामान्य जनतेच्या संपर्कासाठी उपलब्धपरभणी, दि.२९- भारत निवडणूक आयोगाने १७- परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी राजेंद्र कुमार सिंग यांची निवडणूक निरीक्षक (जनरल) म्‍हणून नियुक्‍ती केली आहे.

 निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार सिंग यांचे वास्‍तव्‍य निवडणूक काळात
वैज्ञानिक भवन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी
येथे आहे. त्‍यांच्‍या कक्षाचा  दुरध्वनी क्र ०२४५२-२२३८५४
भ्रमणध्‍वनी क्र. ९०७५०१५२२४ व ईमेल पत्ता obgenparbhani2019@gmail.com
असा आहे.१७- परभणी लोकसभा परिक्षेत्रातील नागरिकांना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात आपल्‍या काही तक्रारी असतील, तर  निवडणूक  निरीक्षक यांच्‍याशी संपर्क  साधावा.
श्री  सिंग हे सकाळी १० ते १२ या दरम्‍यान सर्वसामान्‍य जनतेसाठी उपलब्ध आहेत. त्‍यांचे तात्‍पुरते निवासस्‍थान म्‍हणजेच वैज्ञानिक भवन,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे
निवडणूक निरीक्षक यांच्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी १७- परभणी लोकसभा मतदार संघ यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात निर्भीड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका घ्या - धनंजय मुंडे यांची मुख्य निवडणूक अधिका-यांकडे मागणीएस.पी.आणि पी.आय.  पाळवदेची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी

बीड जिल्हा अतिसंवेदनशील जाहीर करा

मुंबई (प्रतिनिधी) :- दि 30--------- बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने काम करीत असल्यामुळे बीड जिल्ह्यात निर्भीड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका होणार नाहीत त्यामुळे निवडणूक आयोगाने यात लक्ष घालावे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

      या निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांची तातडीने बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करावी अशी मागणीही श्री मुंडे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री नवाब मलिक हेही उपस्थित होते.

      बीड लोकसभेची निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्ह्याचे पोलीस प्रशासन निष्क्रियेतेने व सत्ताधार्‍यांच्या मर्जीने काम करीत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच जिल्ह्यातील जनतेच्या मनात  भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपा उमेदवार प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यास जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीसांसमक्ष मारहाण करण्यात आली. यातील आरोपींना तातडीने जामीन ही देण्यात आला. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या उमेदवारी अर्ज भरतानाच्या वेळच्या सभेलाही सत्ताधार्‍यांच्या दबावापोटी जागा मिळु दिली नाही. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते सोशल मिडीयातून मोठ्या प्रमाणावर धमक्या देत आहेत. याच पार्श्वभूमीवर सदर  तक्रार करण्यात आली.

जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक व पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या आशीर्वादामुळे व निष्क्रियेतेमुळे या गंभीर घटना घडत असल्यामुळे त्यांची तातडीने बदली करावी, जिल्हा अतिसंवेदनशील म्हणुन घोषित करावा, स्थानिक पोलीसांचे सत्ताधार्‍यांशी असलेले लागेबांधे पाहता बाहेरील पोलीसांची कुमक बंदोबस्तासाठी ठेवावी , राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व कुटुंबियास पोलीस संरक्षण द्यावे आदी मागण्याही त्यांनी केल्या.

बीडची लढाई आता जनता विरुद्ध भाजपा त्यांचे गुंड, पोलीस आणि प्रशासनासोबत- धनंजय मुंडे


सारिका सोनवणे वरील हल्ल्याचा केला तीव्र निषेध

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.30....... राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नीवर झालेल्या भ्याड हल्याचा विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तिव्र शब्दात निषेध केला आहे. 

बीडची पोलीस यंत्रणा भाजपाच्या दावणीला बांधली असल्याचा पुर्नउच्चार करताना तुम्हाला बीडचा बिहार करायचा आहे का ? आम्हाला प्रचार ही करू द्यायचा नाही का ? असा जळजळीत सवाल केला आहे.

काल श्री.सोनवणे यांच्या पत्नी सौ.सारिकाताई सोनवणे यांच्यावर धर्माळा, ता.केज येथे गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. 2 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीसांसमक्ष काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना मारहाण करण्यात आली. 

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली आहे. जिल्ह्यात वारंवार अशा घटना घडत असताना भाजपच्या गुंडांची मात्र 10 मिनिटांत सुटका होते, सोशल मिडीयातून जनतेला उघड-उघड धमक्या दिल्या जात असताना पोलीस यंत्रणा सत्ताधार्‍यांच्या दावणीला बांधल्या सारखी काम करीत आहे, कदाचित पोलीसांना बीडचा बिहार करायचा आहे का ? आम्हाला प्रचारही करू द्यायचा नाही  असे वाटते आहे. 

पोलीस आणि प्रशासनाला अशाच पध्दतीने सत्ताधार्‍यांच्या मर्जीने काम करायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी आता आपली निवडणुक ही बीडची जनता विरूध्द सत्ताधारी भाजपा त्यांचे गुंड, पोलीस आणि प्रशासन अशी असेल, असे समजुन लढाईसाठी सज्ज व्हावे असे आवाहन श्री.मुंडे यांनी केले आहे. 

या प्रकरणी आपण निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार असून, सत्ताधार्‍यांनी कितीही पोलीस आणि सत्तेचा गैरवापर केला तरी, त्यांच्या गुंडगिरी विरूध्द लोकशाही मार्गाने लढा देऊन विजय प्राप्त करू असा विश्वास व्यक्त केला आहे.

डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ विविध भागात प्रचारफेरी; परळी शहर झाले कमळमयलाडक्या लेकीला देणार ऐतिहासिक मताधिक्य; शहरात प्रितमताईचीच लाट

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.30........ खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळी शहराच्या विविध भागात आज भाजप-शिवसेना-रिपाइं- रासप- रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी काढून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. घरोघरी पोस्टर, बॅनर, पॉम्पलेट पोंहचत असल्याने शहर कमळमय झाले आहे. दरम्यान, डॉ. प्रितमताई मुंडे आमची लाडकी लेक असुन आम्ही त्यांना मागच्या वेळेस पेक्षा जास्त मताधिक्य देणार असल्याची ग्वाही मतदारांनी दिली. शहरात आपल्या घरचा उमेदवार अशी भावना निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे तर चोहीकडे प्रितमताईंचीच लाट असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला आहे.
आज शनिवार, दि.30 रोजी शहराच्या विविध भागात कार्यकर्त्यांनी भव्य रॅल्या काढून वातावरण ढवळून काढले. सकाळपासूनच वेगवेगळ्या भागात रॅल्या सुरू झाल्या. येऊन येऊन येणार कोण.. प्रितमताई शिवाय दुसरे कोण..., फिर एक बार मोदी सरकार.... महायुतीचा विजय असो... पंकजाताई तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है... अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणुन गेला होता. आज सकाळी गाव भागात हनुमान नगर, पाढंरीचा मळा येथे फेरीचे आयोजन करण्यात आले या वेळी माजी नगराध्यक्ष श्री वैजनाथ तात्या जगतकर परळी शहर भाजपा उपाध्यक्ष श्री महादेव इटके, विकास हालगे, नरेश पिंपळे, सुशील हरुगुंळे, पवन तोडकरी, बंडू चौंडे, विष्णूपंत कुलकर्णी, गजुजी राजनाळे, संदीप बावगे, खाजा थलकरी, अरविंद सातसमुद्रे, जितेंद्र ईटके शंकर स्वामी आदी उपस्थित होते

डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ शहराच्या विविध भागात प्रचार फेरी, नागरीकांची मोठी उपस्थिती

परळी वैजनाथ दि. 29...
      खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळी शहराच्या विविध भागात भाजप - शिवसेना - रिपाइं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी काढुन मतदारांना झालेल्या विकास कामांची माहिती दिली. घरोघरी जाऊन ना. पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी परळी शहर आणि वैद्यनाथ मंदिरासाठी आणलेल्या निधीची माहिती दिली. यावेळी मतदारांनी डॉ. प्रितमताई यांना प्रचंड मतांनी निवडून देणार असल्याचे सांगितले.
      ना. पंकजाताई मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, महायुतीचा विजय असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सुभाष चौक,भिमवडी,सिद्धार्थ नगर,आझाद नगर,काकर मोहल्ला,जुने रेल्वे स्टेशन आदी परिसर अक्षरशः पिंजून काढला. प्रारंभी भाजपचे शहराध्यक्ष जुगरकिशोर लोहिया, विजयकुमार वाकेकर, शांतीलाल लाहोटी, शालिनीताई कराड, मंगलाताई लींगाडे, दिलीप बद्दर, भोजराज पालीवाल, नारायण सातपुते, रवींद्र परदेशी, भाऊराव भोईटे, महेश केंद्रे, प्रितेश तोतला, मोहन जोशी, पवन मोदाणी, नितीन समशेट्टी, सचिन गित्ते, अनिस अग्रवाल आदी मान्यवरांच्या हस्ते प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली.
      यावेळी सय्यद जहीर, फैसल कुरेशी, शेख अतीक , शेख़ गफ्फार,अनीस कुरेशी,हकीम कुरेशी,सय्यद चा॑द, सय्यद अनीस, शेख अय्युब, गोविंद चौरे, सुनील कांबळे, राम मुंडे,वेदांत सारडा,सुभाष सावंत,अशोक पोटभरे,अनिल कांबळे,महादेव व्हावळे,किशोर बहादूरे,बळीराम व्हावळे,शिवा व्हावळे,सिद्धार्थ उजगरे,यश खरे,संघपाल सावंत,संजय उजगरे,सचिन डबडे, बालु फड, सुनील होके,कपिल होके, राहुल गोदाम, सुनिल कांबळे, विजय व्हावळे, सचिन लांडगे, गणेश घांडगे, गंणेश लाडगे, रायभोळे, प्रतिक मस्के, चिव रोडे, मिलिंद लिद लाडगे, निखिल रायभोळे, धनदिप तरकसे, आदर्श मस्के, भिवा कांबळे, राजु कांबळे, शनी सावंत आदींसह भाजप - शिवसेना - रिपाइं - रासप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मतदारांनी आमच्या सर्वांगीण विकासासाठी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनाच प्रचंड मताधिक्याने निवडून देणार असल्याचे सांगितले.
        विद्यानगर भागामध्येही भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी काढुन मतदारांच्या भेटी घेतल्या व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मुंडे भगिनींनी केलेल्या कामाची माहिती दिली. या प्रचार फेरीला भाजपा जेष्ठ नेते दासु वाघमारे, योगेश मेनकुदळे, नरसिंग सिरसाट, अरूण पाठक, बालु जोगदंड , सत्यप्रकाश कराड, गोपी कांगने, प्रशान्त जोगदंड, राजेश अघाव , राहुल वाघमारे, सतीश कराड, बबलू चाटे, कृष्णा सातपुते, रोहित खाड़े, आकाश देशमुख, नरेश कुटे, किशोर तिथे, विजय हजारे, विजय चव्हाण  आदी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी शिवसैनिक सरसावले

गल्लोगल्ली फिरून मतदारांशी साधला संवाद

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. 30.....
     बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजप - शिवसेना - रिपाइं - रासप - रयत क्रांती सेना महायुतीच्या उमेदवार विद्यमान खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी शिवसेना सरसावली आहे. शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी आज शहराच्या विविध भागात प्रचार फेरी काढुन मतदारांशी संवाद साधला. शहराच्या आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनाच पुन्हा प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
        भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-रयत क्रांती सेनेची युती झाल्यापासून सर्वच पक्षांचे पदाधिकारी एकदिलाने कामाला लागले आहेत. परळीच्या शिवसैनिकांनी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी प्रचारात जोरदार सहभाग घेतला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अगदी जोमाने कामाला लागले असून गल्लोगल्ली जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी आज गंगासागर नगर, कृष्णा नगर  , सिद्धेश्वर नगर, खुदबे नगर या भागात प्रचार फेरी काढुन मतदारांच्या भेटी घेतल्या.
       शिवसैनिकांनी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. सुभाष चौक, नुरानी मजीत एरिया, काकर मोहल्ला, आझाद नगर, सिध्दार्थ नगर, भीमवाडी आदी भागातून भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या रॅलीत शिवसेनेचे नेते तथा वैद्यनाथ बँकेचे संचालक नारायण सातपुते, माजी शहर प्रमुख भोजराज पालीवाल, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी, माजी उपनगराध्यक्ष भाऊराव भोईटे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख महेश केंद्रे, प्रकाश साळुंके आदी सहभागी झाले होते.              ‌

मालिकपुऱ्या सहित परळीतील सर्वच मुस्लिम वस्त्यात डॉ प्रीतमताई मुंडे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देणार......!!!मलिकपुऱ्यातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी केला निर्धार
नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या नेतृत्वाखाली खाली मलिकपुऱ्यात भाजपा ची प्रचार फेरी संपन्न

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.30........ खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळी शहराच्या भारतीय जनता पार्टी च्या वतीने नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या नेत्रत्वाखाली खाली  मालिकपूरा भागात  आज भव्य प्रचार फेरी काढण्यात आली,डॉ बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठात स्वतंत्र उर्दू विभाग,हज हाऊस च्या निर्मिती साठी व महाराष्ट्रातील  उर्दू पुस्तक निर्मितीसाठी स्व गोपिनाथ मुंडे साहेबांनी मुस्लिमांना नेहमी चांगले सहकार्याचे काम केले असून मुस्लिम लोकांच्या न्याय हक्कासाठीं ना मुंडे साहेबां प्रमाणेच ना पंकजाताई मुंडे व डॉ प्रीतमताई मुंडे या सुद्धा सतत कार्यरत असतात,केंद्रातील भाजप सरकारने  जनधन योजना,उज्वला गॅस योजना,गरिबांना घरे देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना,गरीबांना मोफत शौचालय आशा अनेक योजना दिल्या आहेत  याचीच  उतराई म्हणून आम्ही मालिकपूराच नाही तर शहरातील संपुर्ण मुस्लिम बहुल भागात डॉ प्रीतम मुंडे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊ असा निर्धार  मलिकपुऱ्या तील मुस्लिम मतदारांनी केला. शहरात आपल्या घरचा उमेदवार अशी भावना डॉ प्रीतम मुंडे यांच्या बद्दल सर्व मतदारांच्या मनात निर्माण झाली आसुन  चोहीकडे प्रितमताईंचीच लाट असल्याचा दावा या वेळी महायुतीच्या नेत्यांनी केला आहे.
या प्रसंगी नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांच्या समवेत भाजपा जेष्ठ नेते राजाभाऊ दहिवाळ यवा कार्यकर्ते वैजनाथ रेकने,भाजप सोशल मिडिया सेल चे विजयकुमार खोसे, मालिकपूरा विभाग प्रमुख अतिक फारुकी सर, फतरू भाई, शेख रफिक,शेख सद्दाम,हया खान, प्रकाश वावदाने लक्ष्मण कळसे यय्या शेख शेख रफिक वजीर खान शेख सद्दाम सय्यद मुन्ना शेख महंमद शेख युनूस शेख फैयाज शेख चांद मोहसीन खान ,शैख साबुद्दिन शेख फरीद  याकुब खान जफर पठाण सय्यद आन्सर,बाबू चाटे,गणेश स्वामी,रोहित चामणार,साहील शेख,  हया खान, सय्यद मुन्ना, वजीर खान, शेख फिरोज, शेख आबेद, युनूस शेख, शेख महेमुद, गणेश घोगरे, मोबीन खान, शेख चाँद, शेख नासर, शेख फरीद, प्रकाश वावदाने, मच्छिंद्र हारेल, लक्ष्मण कळसे, अनिल आव्हाड, दत्ता हारेल, वैजनाथ घोटकर, नवनाथ कस्तुरे,  अभिषेक खोसे, साई तोरडमल आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ शहराच्या विविध भागात प्रचार फेरी, नागरीकांची मोठी उपस्थिती


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. 29...
      खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळी शहराच्या विविध भागात भाजप - शिवसेना - रिपाइं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी काढुन मतदारांना झालेल्या विकास कामांची माहिती दिली. घरोघरी जाऊन ना. पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी परळी शहर आणि वैद्यनाथ मंदिरासाठी आणलेल्या निधीची माहिती दिली. यावेळी मतदारांनी डॉ. प्रितमताई यांना प्रचंड मतांनी निवडून देणार असल्याचे सांगितले. 
      ना. पंकजाताई मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, महायुतीचा विजय असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सुभाष चौक,भिमवडी,सिद्धार्थ नगर,आझाद नगर,काकर मोहल्ला,जुने रेल्वे स्टेशन आदी परिसर अक्षरशः पिंजून काढला. प्रारंभी भाजपचे शहराध्यक्ष जुगरकिशोर लोहिया, विजयकुमार वाकेकर, शांतीलाल लाहोटी, शालिनीताई कराड, मंगलाताई लींगाडे, दिलीप बद्दर, भोजराज पालीवाल, नारायण सातपुते, रवींद्र परदेशी, भाऊराव भोईटे, महेश केंद्रे, प्रितेश तोतला, मोहन जोशी, पवन मोदाणी, नितीन समशेट्टी, सचिन गित्ते, अनिस अग्रवाल आदी मान्यवरांच्या हस्ते प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली. 
      यावेळी सय्यद जहीर, फैसल कुरेशी, शेख अतीक , शेख़ गफ्फार,अनीस कुरेशी,हकीम कुरेशी,सय्यद चा॑द, सय्यद अनीस, शेख अय्युब, गोविंद चौरे, सुनील कांबळे, राम मुंडे,वेदांत सारडा,सुभाष सावंत,अशोक पोटभरे,अनिल कांबळे,महादेव व्हावळे,किशोर बहादूरे,बळीराम व्हावळे,शिवा व्हावळे,सिद्धार्थ उजगरे,यश खरे,संघपाल सावंत,संजय उजगरे,सचिन डबडे, बालु फड, सुनील होके,कपिल होके, राहुल गोदाम, सुनिल कांबळे, विजय व्हावळे, सचिन लांडगे, गणेश घांडगे, गंणेश लाडगे, रायभोळे, प्रतिक मस्के, चिव रोडे, मिलिंद लिद लाडगे, निखिल रायभोळे, धनदिप तरकसे, आदर्श मस्के, भिवा कांबळे, राजु कांबळे, शनी सावंत आदींसह भाजप - शिवसेना - रिपाइं - रासप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मतदारांनी आमच्या सर्वांगीण विकासासाठी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनाच प्रचंड मताधिक्याने निवडून देणार असल्याचे सांगितले. 
        विद्यानगर भागामध्येही भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी काढुन मतदारांच्या भेटी घेतल्या व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मुंडे भगिनींनी केलेल्या कामाची माहिती दिली. या प्रचार फेरीला भाजपा जेष्ठ नेते दासु वाघमारे, योगेश मेनकुदळे, नरसिंग सिरसाट, अरूण पाठक, बालु जोगदंड , सत्यप्रकाश कराड, गोपी कांगने, प्रशान्त जोगदंड, राजेश अघाव , राहुल वाघमारे, सतीश कराड, बबलू चाटे, कृष्णा सातपुते, रोहित खाड़े, आकाश देशमुख, नरेश कुटे, किशोर तिथे, विजय हजारे, विजय चव्हाण  आदी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी शिवसैनिक सरसावलेगल्लोगल्ली फिरून मतदारांशी साधला संवाद 

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :- दि. 30.....
     बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजप - शिवसेना - रिपाइं - रासप - रयत क्रांती सेना महायुतीच्या उमेदवार विद्यमान खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी शिवसेना सरसावली आहे. शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी आज शहराच्या विविध भागात प्रचार फेरी काढुन मतदारांशी संवाद साधला. शहराच्या आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनाच पुन्हा प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. 
        भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-रयत क्रांती सेनेची युती झाल्यापासून सर्वच पक्षांचे पदाधिकारी एकदिलाने कामाला लागले आहेत. परळीच्या शिवसैनिकांनी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी प्रचारात जोरदार सहभाग घेतला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अगदी जोमाने कामाला लागले असून गल्लोगल्ली जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी आज गंगासागर नगर, कृष्णा नगर  , सिद्धेश्वर नगर, खुदबे नगर या भागात प्रचार फेरी काढुन मतदारांच्या भेटी घेतल्या.
       शिवसैनिकांनी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. सुभाष चौक, नुरानी मजीत एरिया, काकर मोहल्ला, आझाद नगर, सिध्दार्थ नगर, भीमवाडी आदी भागातून भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या रॅलीत शिवसेनेचे नेते तथा वैद्यनाथ बँकेचे संचालक नारायण सातपुते, माजी शहर प्रमुख भोजराज पालीवाल, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी, माजी उपनगराध्यक्ष भाऊराव भोईटे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख महेश केंद्रे, प्रकाश साळुंके आदी सहभागी झाले होते.              ‌

परळीच्या बाजारात मेथीची भाजीचा तुटवडा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळीच्या भाजी बाजारात मागील आठवडाभरापासून मेथीची भाजी मिळत नसल्याने पालेभाजी खाणाऱ्या नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. पुरेसे पाणी नसल्याने मेथीच्या भाजीचा तुटवडा असून आता मेथी बाजारात दुर्मिळच होईल असेच दिसते.
शरीराच्या दृष्टीकोनातून पालेभाज्यांचे मोठे महत्व आहे. त्यातही मेथीला सर्वस्तरातून अधिक मागणी होतांना दिसते. परंतू मागील आठवडाभरापासून परळीच्या आठवडी बाजारात मेथीची भाजी फारशी दिसून येत नाही. सध्या पालेभाज्या वाढीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने भाजीची टंचाई दिसून येते. याबाबत संगम येथील शेतकरी अरूण नागरगोजे यांना विचारले असता सध्या मेथीचा सिझन संपत आला असून येत्या काही दिवसात फारशी मेथी ग्राहकांना मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या उन्हाळयाचे दिवस असून मेथीच्या भाजीसाठी भरपूर पाणी आवश्यक असते. उन्हाळा व पाणी टंचाई लक्षात घेता मेथीची लागवड आता फारशे शेतकरी करीत नसल्याचे ते म्हणाले.

लोणारवाडी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न


परळी-वैजनाथ  (प्रतिनिधी) :- 
अखंड हिंदुस्थानचे आराद्य दैवत तथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परळी वैजनाथ तालुक्यातील लोणारवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
  लोणारवाडी येथे दर वर्षी मावळा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करून शिवजयंती साजरी केली जाते.या वर्षी देखील शिवप्रतिमेचे पुजन व भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करत भव्य मिरवणुक काडून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते तुळजाभवानी, राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवजी महाराज, क्रांतीवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली. प्रतिमापूजनानंतर भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करून ढोल-ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी,छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगन भेदी घोषणा देत भव्य मिरवणुक काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच नवनाथ मुंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते मुन्ना बागवले, उप सरपंच कुंडलिक कोळेकर, सुरेश नानवटे,बजरंग औटी,रवि गित्ते हे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मावळा शिवजयंती उत्सव समिती बबन ढेंबरे, नागनाथ तुपसैवदंर, अंबाजी अटपळकर,जोतिबा ढेंबरे, बाळासाहेब ढंगेकर, संजय अटपळकर,संतोष कोळेकर, कैलास तुपसैवदंर,जगन्नाथ तुपसैवदंर,पप्पू ढेंबरे, राम अटपळकर,बाळासाहेब तुपसैवदंर,सोमनाथ खांडेकर,
सुभाष पवार, तुकाराम धनगर, कैलास गव्हाणे,सुरेश धनगर, संतोष अटपळकर यांनी अथक परिश्रम घेतले.

अफवा व खोट्या बातम्या पसरवू नयेत धर्माळा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस व प्रशासनाचे आवाहन


बीड (प्रतिनिधी) : - धर्माळा तालुका धारुर येथे राजकीय पक्षाच्या प्रचार सभे दरम्यान झालेल्या घटनेच्या अनुषंगाने अफवा खोटी बातमी व क्लिप्स समाज माध्यमांद्वारे प्रसारित करीत आहेत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये दोषी आढळल्यास कायद्यानुसार कडक कारवाईची तरतूद आहे.  या पार्श्वभूमीवर समाज स्वास्थ बिघडविणाऱ्या अफवा अथवा खोट्या बातम्या पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे
बीड लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी घेतली जात असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. गुन्हेगारां वर कारवाई केली जात आहे तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन होऊन निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी सांगितले
       धर्माळा येथील  घटनेतील  दोषी  व्यक्तीवर  पोलिसांच्या वतीने  कारवाई  केली गेली असून  राजकीय पक्षांच्या उमेदवाराशी या घटनेचा संबंध आढळून आलेला नाही. यामुळे निवडणुकीच्या काळात समाज माध्यमांवर पोस्ट प्रसारित करताना अथवा फॉरवर्ड करताना सावधानता बाळगावी तसेच चुकीच्या खोट्या बातम्या व्हायरल होत असल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणावे. यासाठी 7030008100 हा हेल्पलाईन क्रमांक पोलीस विभागातर्फे सुरू करण्यात आलेला आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले आहे.

प्रितमताईन बहुमतेती विजय करेसारू ” ची ग्वाही देत राष्ट्रवादीचे असंख्य बंजारा कार्यकर्ते भाजपात


ना. पंकजाताई मुंडे यांनी स्वागत करून दिले विकासाचे वचन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. 30….
” प्रितमताईन बहुमतेती विजय करेसारू” म्हणजे प्रितमताई यांना आम्ही प्रचंड मताधिक्य देऊ अशी ग्वाही देत वसंतनगरच्या असंख्य बंजारा कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी सर्वांचे स्वागत करून तांड्याचा सर्वांगीण विकास करण्याचे वचन दिले. ना. पंकजाताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन बंजारा कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
ना. पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनाच विकासाची दृष्टी आहे त्यांनी बंजारा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. तर तांड्या तांड्यावर रस्त्याचे जाळे निर्माण केले आहे. राष्ट्रवादी पक्षाने केवळ मतांसाठी आमचा वापर केला मात्र विकास केला नाही असा आरोप करीत आम्हाला न्याय देण्याची क्षमता केवळ ना. पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मध्येच आहे म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आम्ही भाजपात प्रवेश करीत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन विजय राठोड, वकील राठोड, बबन चव्हाण, रेणू चव्हाण, कृष्णा राठोड, दशरथ राठोड, सुखदेव चव्हाण, संजय राठोड, विनोद राठोड, संतोष राठोड, पपन राठोड, संजय जाधव, अजय राठोड, रामेश्वर राठोड, दत्ता राठोड, बाबा महाराज वसंतनगरकर, प्रेमदास राठोड, अविनाश भैय्या जाधव आदी कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
यशश्री निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून पक्षात प्रवेश दिला. यावेळी बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, सर्व तांड्यासह वाडी वस्तीच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आम्ही कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकीसाठी वापर करीत नाहीत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर बंजारा समाजाने खुप प्रेम दिले, त्यांचाच वारसा आम्ही पुढे चालवत असुन कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचा वसा आम्ही साहेबांकडून घेतला आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून काम करा मी वीकासासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.
आम्ही खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी विमलबाई जाधव, सचिन गित्ते, पप्पू चव्हाण, वसंत राठोड, संतोष राठोड, विलास राठोड, रमेश राठोड यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. पंकजाताई मुंडे यांचा आष्टी - पाटोदा तालुक्यात झंझावातराष्ट्रवादीने जिल्हा खड्ड्यात घातला आम्ही मात्र  रस्ते चकाचक केले - ना.पंकजाताई मुंडे

आम्ही आमच्या वडिलांचे नाव घेतले तर तुमच्या पोटात का दुखते? विरोधकांवर हल्लाबोल

बीड (प्रतिनिधी) :- दि.३०------ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची सत्ता असताना जिल्ह्याला खड्ड्यात चालण्याचे काम केले, आम्ही मात्र केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांचा निधी आणुन जिल्ह्य़ातील रस्ते चकाचक केले आणि याच विकासाच्या बळावर जनता आमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिल असा विश्वास राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला. आम्ही आमच्या वडीलांचे नाव घेतले तर तुमच्या पोटात का दुखते? स्वत: पुढे येण्याची हिंमत न दाखवता अपक्ष उमेदवाराला पुढे करून कसले घाणेरडे राजकारण करता अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.
         बीड लोकसभेच्या भाजप - शिवसेना - रिपाइं - रासप महायुतीच्या उमेदवार खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज आष्टी - पाटोदा तालुक्यात झंझावाती दौरा केला. डोंगरकिन्ही येथील सभेत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी आ.सुरेश धस, आ.भीमराव धोंडे, माजी आ.साहेबराव दरेकर, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

     लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्वप्नातील नगर-बीड-परळी रेल्वे सोलापूरवाडीपर्यंत आली आहे. ही रेल्वे लवकरच परळीपर्यंत येईल असे सांगून त्या म्हणाल्या की, आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच आमदार होते. मुंडे साहेबांना विरोध करण्यासाठीच राष्ट्रवादीने आणखी पाच जणांना विधान परिषदेवर घेतले. त्यांनी जिल्ह्यातील जनतेच्या तोंडाला नेहमी पानेच पुसली. आमचे भाऊही मोठ्या ऐटीत राष्ट्रवादीत गेले. कुणी दिलं का दिलं त्यांना मंत्रीपद? मी भाजप सरकारमध्ये मंत्री झाल्यावरच त्यांच्या नावापुढे नामदार पद लागलं असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला. जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था राष्ट्रवादी व कॉंग्रेस सरकारच्या काळात अत्यंत दयनीय झाली होती. राष्ट्रवादीने जिल्हा खड्ड्यात घातला. मात्र भाजपा सरकार आल्यानंतर आणि मी पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील रस्ते चकाचक होत आहेत. मुंडे साहेबांचे स्वप्न अहमदनगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीडच्या सभेत मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करू असे आश्‍वासन दिले आणि स्पेशल पर्पज व्हेईकलमध्ये या रेल्वेमार्गाचा समावेश करून तब्बल २८०० कोटी रूपये दिले. यामुळे बीड जिल्ह्यातील सोलापूरवाडीपर्यंत आता रेल्वे आली आहे असंही पंकजाताई या वेळी म्हणाल्या.

..तर तुमच्या पोटात का दुखते?
---------------------------------
प्रितमताईंच्या पाठपुराव्यामुळे केंद्राकडून जिल्ह्यात १० हजार कोटींच्या रस्त्याची कामे सुरू आहेत. मुंडे साहेब उपमुख्यमंत्री असताना  नगर- अंमळनेर- डोंगरकिन्ही मार्गे नगर हा रस्ता केला होता त्यानंतर या रस्त्यावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांनी एक टोपली खडीसुद्धा टाकली नाही. मात्र, मी पालकमंत्री झाल्यानंतर आ.भीमराव धोंडे यांच्या मागणीनंतर हा रस्ता पुन्हा एकदा केला. मुंडे आणि धोंडे यांच्यासोबत आता आ.धस आल्याने आमची ताकद आता आष्टीत वाढलेली आहे. मुंडे-धोंडे- धस- दरेकर अशी आमची वज्रमुठ झालेली असल्याने समोरचा उमेदवार आमच्यापुढं टिकू शकत नाही. गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारने शंभर टक्के शौचालये बांधली. प्रधानमंत्री आवास योजनेतून एकही व्यक्ती बेघर राहणार नाही याचा विचार केला गेला. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची पालक होऊन सर्वांगीण विकास केला. त्याचमुळे आष्टी मतदारसंघातून ‘न भूतो न भविष्यती’ असे मताधिक्य प्रितमताईंना मिळेल. स्वत: पुढे येण्याची हिंमत न दाखवता अपक्ष उमेदवाराला पुढे करून स्व.गोपीनाथ मुंडे यांचं नाव लावल्याचा आक्षेप आमच्याविरुद्ध घेण्यात आला. माझे बाबा गोपीनाथराव मुंडे यांचे नांव आम्ही वापरल्याने यांच्या पोटात का दुखतंय? असा सवाल त्यांनी या वेळी केला.

   प्रितमताईंनी कोट्यावधींचा निधी आणून स्वकर्तृत्वावर जिल्ह्याचा विकास केला आता पुन्हा एकदा त्या निवडणुकीत उभ्या आहेत. त्यांच्यासमोर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्याची ताकद नसलेला, भविष्य नसलेला उमेदवार उभा आहे. त्यामुळे प्रितमताईंना मोठं मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी प्रितमताईंना तुमच्या ओटीत घालते त्यांना तुम्ही सांभाळाल याचा मला विश्‍वास आहे आणि त्यांच्या विजयाचा गुलाल खेळण्यासाठी मी नक्की आष्टी मतदारसंघात येईल, असेही त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादी कडून सोशल मिडियाचा गैरवापर
----------------------------------
यावेळी आ.सुरेश धस यांनी आपल्या भाषणात बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जिल्ह्यात चांगली माणसे उरलेली नाहीत. जाती-पातीत विद्वेष पसरविण्यासाठी विरोधक सोशल मिडियाचा गैरवापर करत आहेत. प्रितमताईंचा विजय निश्‍चित असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खालच्या दर्जाचे किळसवाणे राजकारण घडवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.  ज्या गावचा सरपंच राष्ट्रवादीचा, गाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचं त्या गावात व्यक्तीगत भांडणं झाली त्याचंही राजकीय भांडवल करणार्‍यांना जनता या निवडणुकीत माफ करणार नाही. पंकजाताई आणि प्रितमताई या स्वत: महिला असल्याने त्यांना महिलांचं दु:ख माहित आहे असेही ते म्हणाले. या सभेला पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही व परिसरातील भाजपा, शिवसेना, रासप, रिपाई व महायुतीचे पदाधिकारी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागापूर खुर्द येथील ७ वी च्या विदयार्थ्याचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न


बीड (प्रतिनिधी) :- जि प प्रा शा नागापूर खुर्द येथे इयत्ता ७वीच्या विदयार्थ्याचा निरोप समारंभाचा कार्यक्रम इयत्ता सहावी ने आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सय्यद मॅडम ह्या उपस्थित होत्या . तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे प्रथम नागरिक , सरपंच मा  श्री मसुरामजी साळुंके , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा श्री हनुमान साळुंके , खांडे पारगांव केंद्राच्या केंद्र प्रमुख श्रीमती शेख शमा मॅडम , केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री महादेव चव्हाण , गोरख लव्हाळे , कैलास थोरात आदी मान्यवर उपस्थित होते .
         कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर    इयत्ता सहावी व इयत्ता सातवी च्या विदयार्थ्यानी उपस्थित मान्यवरांसाठी अतिशय छान असे स्वागतगीत सादर केले . त्यानंतर विदयार्थ्याची समोयचित भाषणे झाली . त्यात आदित्य साळुंके , वैष्णवी सिरसाट ,करण साळुंके , कौशल रांजणे , सुरज साळुंके , साधना साळुंके , ज्ञानेश्वरी साळुंके यांनी सहभाग नोंदवला . त्यात वैष्णवी हिने आपल्या भाषणातून शाळेविषयी मत मांडताना म्हणाले की , गाईच्या मागे फिरते वासरू व मी माझ्या जिल्हा परिषद शाळेला कसे विसरू अशा शब्दात तिने शाळेविषयीचे मत व्यक्त केले तसेच तिने  शिक्षकांविषयीही व त्यांच्या अध्यापनाविषयी खुप कौतुक केले .आम्ही या शाळेत जे काही घडलो , ते शिक्षकांमुळेच असे ठाम मत तिने व्यकत केले . 
               त्यानंतर इयत्ता सातवीच्या विदयार्थांनी शाळेसाठी भेटवस्तू दिली . त्याचा स्वीकार शाळेनी केला . त्यानंतर उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली . त्यात केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती शेख शमा मॅडम यांनी विदयार्थ्याना मौलिक असे मार्गदर्शक केले , त्यांनी विदयार्थ्याना शिक्षणातून ध्येयापर्यत कसे पोहचावावे ह्या विषयी सखोल मार्गदर्शन केले . तसेच केंद्राचे केंद्रीय मु . अ .च०हाण सर यांनी मुलांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या . शाळेचे पदवीधर शिक्षक भोसले सर यांनी ही मुलांना जीवनात कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही . त्यासाठी भरपूर कष्ट करा असे सांगितले . कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती सय्यद मॅडम यांनी अध्यक्षीय समारोप केला . त्या म्हणाल्या की ,
डर कर नौका 
पार नही होती और 
कौशिश करने वालो की हार नही होती . त्यामुळे जिवनात प्रयत्न करा असे त्यांनी सांगितले .
             संपुर्ण कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन अजित मुळूक सर यांनी यशस्वीरित्या पार पाडले . तर आभार प्रदर्शन श्रीमती छत्रबंद मॅडम यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाड़ण्यासाठी शाळेच्या मु . अ . श्रीमती सय्यद मॅडम , श्रीनिवास भोसले , अजित मुळूक , प्रज्ञा उजगरे , अयोध्या आंधळे ,  प्रतिमा छत्रबंद , अलका गेठे व इयत्ता सहावीच्या विदयार्थ्यानी परिश्रम घेतले . यावेळी इयत्ता सहावीच्या विदयार्थ्याकडून सातवीच्या विदयार्थ्याना स्नेहभोजन देण्यात आले .

जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांना सामान्य माणसाची व्यथा का दिसत नाही ?- धनंजय मुंडे

बजरंगबप्पांच्या प्रचारार्थ एकाच दिवसात 13 गावांचा मॅरेथॉन दौरा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.30....... बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्यात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या होम ग्राऊंड परळी मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. मोठ्या सभांऐवजी मतदारांशी त्यांच्या गावात जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आवाहन करण्यावर त्यांनी भर दिला असून, याच अभियानांतर्गत काल शुक्रवारी त्यांनी तब्बल 13 गावांचा मॅरेथॉन दौरा केला.

सकाळी 8 वाजल्यापासून कौठळी येथुन आपल्या दौर्‍याची सुरूवात करताना बेलंबा, लोणारवाडी, सेलू, लोणी, दा.वडगाव, दगडवाडी, धारावती, वैजवाडी, मिरवट, कासारवाडी, नंदनज अशा बारा गावांचा दौरा करून सायंकाळी सारडगाव येथे जाहीर सभेला संबोधित केले.

स्व.मुंडे साहेबांच्या निधनानंतरच्या निवडणुकीत जनतेने भरभरून मुंडे भगिनींना प्रेम दिले असतानाही जिल्ह्याच्या उपेक्षा का ? असा प्रश्न त्यांनी केला. डोळ्यात पाणी आणि भावनिक करून जनतेचे प्रश्न सुटत नसतात, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री समजण्यापेक्षा, सामान्य माणसाच्या व्यथा त्यांच्या प्रतिनिधी म्हणुन समजल्या पाहीजेत, तोच खरा लोकप्रतिनिधी असतो, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. तुमच्या मोठ्या पणाचा जनतेला काय उपयोग? लातूरहून मुंबईला जाणारी रेल्वे परळीत का थांबवता आली नाही ? लातूरचा रेल्वे डब्यांचा कारखाना परळीत का आणता आला नाही ? वारसा हक्काने मिळालेल्या संस्था कर्जाच्या खाईत गेल्या, ऊस वाळत असताना ऊसात राजकारण केले, ज्यांचा ऊस गेला त्यांचे पेमेंटही दिले नाही, अशांना आता मतदान का करायचे- असा सवाल त्यांनी केला. 

यावेळी या दौर्‍यात त्यांच्या समवेत जि.प.सदस्य प्रा.मधुकर आघाव, पं.स.सदस्य सटवाजी फड, संजय आघाव, सरपंच वसंतराव आघाव, उपसरपंच माऊली मुंडे, विकास बिडगर, बंडु गुट्टे आदींसह गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पाथरीत इव्हिएम व्हिव्हिपॅट प्रशिक्षणास प्रतिसाद


प्रतिनिधी
पाथरी:-,येथील तहसिल कार्यालयात मतदान अधिकारी, कर्मचारी यांना इव्हीएम मशिन सोबत व्हिव्हीपॅट उपलब्ध करून दिली असून हे मशीन हाताळण्याचे प्रात्यक्षिक दिले जात असल्याची माहिती उपविभागिय अधिकारी तथा सहायक निवडणुक अधिकारी व्हि एल कोळी यांनी दिली.
यावर्षीच्या निवडणुकीत प्रथमच व्हिव्हीपॅट चा उपयोग होत असून मतदारांना त्यांनी केलेले मतदान या मशिनवर पाहाता येणार आहे.तसेच मतदान झाले की नाही याची खात्री करता येणार आहे.व्हिव्हीपॅटचा वापर प्रथमच लोकसभा निवडणुकीत होत असल्याने या बाबतच्या प्रशिक्षणास प्राधान्य दिले जात आहे.या प्रशिक्षणात ही मशीन सील करणे, जोडणे, मशीन योग्य प्रकारे हाताळणे इत्यादींचा सामावेश आहे. तसेच हे प्रशिक्षण दि २४मार्च रोजी औद्येगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)  मध्ये ही देण्यात आले होते. या नंतर २५ मार्च पासून १५ एप्रिल पर्यंत तहसिल कार्यालयात हे प्रशिक्षण सुरू असून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.मतदान अधिकारी,कर्मचारी इव्हिएम व व्हिव्हीपॅटचे प्रशिक्षण स्वयंस्फुर्तीने घेत आहेत हे प्रशिक्षण सहायक निवडणुक निर्णय अधिकारी व्हि एल कोळी, पाथरीच्या तहसिलदार भाग्यश्री देशमुख, मानवत चे तहसिलदार डि डि फुपाटे, सोनपेठचे तहसिलदार आशिषकुमार बिरादार यांच्या निर्देशानुसार मास्टर ट्रेनर सोनवळकर यांच्या मार्गदर्शना खाली माणिक घाटूळ, संजय पवार, संजय चिंचाने, वसंत वांगिकर,विलास मिटकरी, तुपसागर हे प्रशिक्षण देत आहेत

जी.डी.इंग्लिश स्कूल पाथरी चे तिसरे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा

 प्रतिनिधी
पाथरी:-,शहरातील नामवंत जि डी इंग्लिश स्कूल चा "गौरव स्त्री शक्तीचा" स्नेहसंमेलन कार्यक्रम शुक्रवार २९ मार्च २०१८ रोजी पार पडला.

या वेळी कायर्क्रमाच्या अध्यक्ष स्थानी  प्रवीण देशमुख संस्थपक अध्यक्ष लोणार शिक्षण प्रसारक मंडळ हे होते तर प्रमुख उपस्थितीत रोहिदास टेंगसे केंद्र प्रमुख प्रमुख उपस्थिती शेतिनिष्ठ शेतकरी  पुरस्काराने सान्मानित सदाशिव थोरात ,क्रीडा प्रेमी छत्रपती पुरस्कार सन्मानित भारत धरले,जेष्ठ पत्रकार तथा जन्मभूमी फाउंडेशनचे सचिव किरण घुंबरे पाटील यांच्या सर्वांच्या उपस्थित दीप ज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल पुष्प गुच्छ स्मतिचिन्ह देऊन गौरव करत शाळेचे संचालक राम घटे व शेख सलिम यांनी स्वागत केले.

कार्यक्रमाचे मुख्य उद्देश गौरव स्त्री शक्तीचा हे होते विविध क्षेत्रातील पाच कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार सोहळा येथे घेण्यात आला .
या मध्ये सौ भावनताई नखाते,सौ मीनाताई भोरे,सौ जयश्रीताई घटे,डॉ रोहिणी देशमुख, मनीषा जाधव संगीता मंत्री,वृन्दावणी गोरे यांना पुष्प गुच्छ व सम्मान चीन्ह देऊन गौरविण्यात आले

त्या नंतर जी डी इंग्लिश स्कूल च्या  लहान चिमुकल्यांचे   रेकॉर्डडान्स घेण्यात आले या सर्व मुलांना देशावरील प्रेम, महिला डॉ नसल्याने होणारे परिणाम विविध प्रकारचे संदेश आपल्या नृत्या च्या आधारे आलेल्या सर्व पालकांचे मन जिंकून कौतुकाची थाप घेतली. दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी कार्यक्रमास उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला या कार्यकचे सूत्र संचालन वायकोज यांनी केले तर आभार शाळेचे संचालक शेख सलिम यांनी केले.