तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 March 2019

परळी तालुक्यात 104 गावे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी सज्जगेल्या वर्षी तालुक्यात मोहा गावाने दहा लाखांचे मिळविले बक्षिस 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.13
    पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 साठी परळी तालुक्यातील 107 गावां पैकी 104 गावांनी सहभाग घेण्यासाठी फॉर्म भरलेला आहे. त्यापैकी 53 गावांनी प्रशिक्षण घेतले आहे. तर उर्वरित गावचे ग्रामस्थ प्रशिक्षण घेण्यासाठी रवाना होणार आहेत. अमिर खान संस्थापक असलेल्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने परळी तालुक्यात वॉटर कप स्पर्धेसाठी  ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. श्रमदानातुन  होणार्‍या पाणी बचतीच्या कामांमुळे पाऊस पडल्यास हा परिसर सुजलम सुफलम होईल. 
    वॉटर कप 2019 मुल्यांकन पध्दतीनुसार स्पर्धेपुर्वीची कामे करण्यासाठी ग्रामस्थ सरसावत आहेत. 8 एप्रिल ते 22 मे दरम्यान स्पर्धेचा कालावधी असुन राज्य पातळीवर प्रथम येणार्‍या गावास 75 लाख, 50 लाख, 40 लाख असे बक्षीस देण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यातुन पहिल्या येणार्‍या गावास 10 लाख रुपयांची बक्षिस देण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी परळी तालुक्यातील मोहा गावाने 10 लाखांचे परितोषिक प्राप्त केले आहेत. यावर्षीही बक्षीस मिळविण्याच्या दृष्टीने मोहा गाव सज्ज झाले आहे. 
    सत्यमेव जयते, वॉटर कप स्पर्धा 2019 साठी श्रमदान, यांत्रिक कामे, वॉटर बजेट, माथा ते पायथा , उपचार योग्यभर, कामाचा दर्जा, सांडपाण्याचा वापर, वृक्ष संवर्धन, इन सिटू उपचार, पाणी बचत तंत्रज्ञान आदी अस्त्विात असलेल्या सलचराची दुरुस्ती यास गुण देण्यात येणार आहेत. परळी तालुक्यातील 53 गावच्या ग्रामस्थांना पाणी फाऊंडेशनच्या वतीने दिपेवडगाव तालुका केज व औसा तालुक्यातील दायेतपूर येथे प्रशिक्षण देण्यात आले. एका बॅच मध्ये 10 गावांचा समावेश आहे.अशी माहिती पाणी फाऊंडेशनचे तांत्रिक प्रशिक्षक प्रमोद शिंदे यांनी बोलतांना दिली. 
    स्पर्धेपुर्वी सांडपाण्याचा वापर, वृक्षसंवर्धन, माती तपासणी, आग पेटी मुक्त शिवार, जल बचतीचे कामे, करावयाची आहेत. जलमित्रांनी या कामाचे नियोजन करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. 
    परळी तालुक्यातील टोकवाडी, कौडगाव साबळा, डांबी तांडा, भिलेगाव, इंदपवाडी, मोहा, कावळेवाडी, बोधेगाव, नागपिंपरी, कौठळी, वानटाकळी, मलनाथपुर, डाबी, दौनापूर, लोणी, बहादुरवाडी, नागापुर, सेलु, इंजेगाव, सेलु परळी, इंदिरानगर, मैंदवाडी, तडोळी, सोनहिवरा, लाडझरी, मलकापुर यांच्यासह इतर गावच्या ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment