तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 March 2019

ब्रह्माकुमारिज विद्यालयातिल 12 शिव ज्योतिर्लींग प्रदर्शनीला भव्य प्रतिसाद
आकर्षक ज्योतिर्लींग प्रदर्शनिचे आकर्षण

 रिसोड महेंद्रकुमार महाजन जैन 
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरिय विश्व विद्यालय रिसोड च्या वतीने आयोजित 12शिव ज्योतिर्लींग  दर्शन प्रदर्शनीला रिसोड शहारासह संपुर्ण तालुक्यातील भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद 
 दिला.ब्रह्माकुमारीज विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी नगराध्यक्षा सौ विजयमाला असनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालीका ब्रह्माकुमारी ज्योती दिदि यांच्या शुभहस्ते शिवध्वजारोहन करण्यात आले.
 12 ज्योतिर्लींगाचे पूजन 12 मान्यवर जोडप्यांच्या हस्ते करण्यात आले.ज्योती दिदिंनी उपस्थितांना शिवजयंती चे अध्यात्मिक महत्व सांगितले तसेच 12 ज्योतिर्लींग शिव परमात्माच्या गुणवैशिष्ट्याचे प्रतिक असुन शिवपरमात्मा  ज्ञानसागर,शांतीसागर,प्रेमसागर,आनंद सागरआहे , परमात्म गुणांचे ग्रहण करण्याचा संकल्प करुन परमात्म स्वरुप बनण्याच्या द्रुढसंकल्प हाच शिवजयंती उत्साहाचे मर्म असल्याचे मनोगत दिदिनी व्यक्त केले.
 नगराध्यक्षा असनकर यांनी 12 ज्योतिर्लींगाच्या अतिशय आकर्षक प्रतिकृतीचे दर्शन म्हणजे साक्षात ज्योतिर्लींगाचे दर्शन घेतल्याची अनुभूती मिळाली व संपुर्ण भारत भ्रमण करुन ज्योतिर्लींगाचे दर्शनाचा आनंद मिळाल्याचे मनोगत व्यक्त केले व विद्यालयाच्या अध्यात्मिक व इश्वरिय सेवा कार्याबद्दल दिदिंची प्रशंशा केली.
दोन दिवस असणारया प्रदर्शनीच्या पहिल्या दिवशी सकाळी 8ते रात्री 8 पर्यंत रिसोड शहारासह तालुक्यातील अनेक मान्यवरांसह हजारो भक्तांनी ज्योतिर्लींगाचे दर्शन घेतले.विद्यालयाच्या सर्व ज्ञानार्थी भाऊ बहिनिनी भक्तांची सेवा केली.

महेंद्रकुमार महाजन जैन 
9960292121
9420352121

No comments:

Post a Comment