तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 March 2019

बँकेत जमा केले 17 हजार रुपये जमा झालेच नाही दादाराव मुंडे यांची संभाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार


परळी वैजनाथ दि.11
    येथील सुभाष चौक रोडवरील एका बँकेत खात्यात जमा केलेली रक्कम जमाच झाली नाही. अशी तक्रार दादाराव संभाजीराव मुंडे यांनी परळीच्या संभाजीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी केली आहे. 8 मार्च रोजी दादाराव मुंडे यांनी बंँकेत 17 हजार रुपये जमा केले होते. तशी पावतीही त्यांनी घेतली. परंतु त्यांच्या खात्यात ही रक्कम जमाच झाली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दादाराव मुंडे यांनी पोलिस ठाण्यात एका अर्जद्वारे केली आहे. संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार म्हणाले की, दादाराव मुंडे यांचा अर्ज प्राप्त झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल व संबधीत बँक अधिकार्‍यांकडुन खुलासा मागविण्यात येईल त्यानंतर योग्यती कारवाई केली जाईल.

No comments:

Post a Comment