तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 March 2019

परभणी लोकसभा निवडणूक-2019 निवडणूकीची अधिसुचना जारीपरभणी,दि.19 :-  17- परभणी लोकसभा मतदार संघातून एका सदस्याची लोकसभेसाठी निवडणूक घ्यावयाची आहे. नामनिर्देशन पत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सुचकाला, निवडणूक निर्णय अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, परभणी यांच्याकडे मंगळवार दि.26 मार्च 2019 पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात दाखल करता येतील.

नामनिर्देशनपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व वेळी मिळू शकतील, नामनिर्देशपत्रांची छाननी दि.27 मार्च 2019 रोजी सकाळी ठिक 11 वाजता बैठक हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सुचना उमेदवाराला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकृत केलेल्या त्याच्या कोणत्याही सुचकाला निवडणूक प्रतिनिधीला वरील परिच्छेद (2) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात दि.29 मार्च 2019 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत देता येईल. निवडणूक लढविली गेल्यास गुरुवार दि.18 एप्रिल 2019 रोजी सकाळी ठिक 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी.शिवशंकर यांनी कळविले आहे.

No comments:

Post a comment