तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 March 2019

अस्वलाच्या हल्ल्यात 29 वर्षीय तरुण गंभीर जखमीकाजनपुर शिवारातील घटना शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

मोताळा:- तालुक्यातील काजनपुर शिवारात शेतात काम करीत असलेल्या सहस्त्रमुळी येथील 29 वर्षीय सोमनाथ शामराव हाके हा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवार दिनांक 4 मार्च रोजी सकाळी घडली शिवारात अस्वल असल्याची वार्ता पसरताच  परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मोताळा तालुक्यातील कोथळी लगतच्या सहस्रमुळी येथील 29 वर्षीय सोमनाथ शामराव हाके शेतात काम करीत असताना पाठीमागून आलेल्या अस्वलाने अचानक तरुनाच्या पाठीचा चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला
                  दरम्यान परिसरातील अन्य शेतात काम करणाऱ्या मजुरांनी धाव घेऊन सोमनाथला वाचविण्याचा प्रयत्न केला जखमी सोमनाथवर प्रथम मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ परेश जैस्वाल यांनी प्रथम उपचार केले असून अस्वलाने पाठीचा चावा घेत असतांना त्याचे दात तरुणाच्या पाठीमध्ये खोलवर  रुतल्या गेल्याने पाठीचा एक्सरे काढण्यासाठी व पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे पाठविण्यात आले आहे तरुणावर अस्वलाने हल्ला झाल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कोंडावार व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून वनविभागाच्या जलदकृती दलाच्या पथकाला काजनपुर शिवारात पाचारण करण्यात आले असून सदरचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कोंडावार यांनी दिली आहे

No comments:

Post a Comment