तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 March 2019

परळीचे वैद्यनाथ मंदिर भक्तांच्या गर्दीने फुलले हर हर महादेवच्या जय घोषात 3 लाख भाविकांनी घेतले प्रभु वैद्यनाथाचे दर्शन

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी घेतले वैद्यनाथाचे दर्शन 

महादेव गित्ते
----------------------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :- दि.04
    सोमवारीच महाशिवरात्र आल्याने प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भक्तांचा जनसागर उसळला होता. रविवार रात्री 12 वाजल्यापासुन वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातुन व परराज्यातुन भाविक मोठ्या प्रमाणात आले होते. रांगेत थांबुन शांततेत भाविकांनी प्रभु वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. बिल्वपत्र व पुष्पहार अपर्ण करुन भाविकांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले. सोमवारी पहाटे 2.50 च्या सुमारास भक्तांची संख्या वाढली. सकाळीही भक्तांची मंदिरात गर्दीच होती. दुपारीही रांगा लागल्याच होत्या. 3 लाखांच्या वर भाविकांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले. हर हर महादेव, वैद्यनाथ भगवान की जय या जय घोषाणे वैद्यनाथ मंदिर परिसर दुमदुले होते. वैद्यनाथ मंदिर परिसरात पोलिसांचा दगडा बंदोबस्त होता. परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील श्री सोमेश्‍वराचीही पालखी प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी वाजत गाजत शहराच्या पारंपारिक मार्गांवरुन आली होती. या पालखीचे ठिकठिकाणी भक्तांनी दर्शन घेऊन स्वागत केले. पन्नगेश्‍वर शुगर्सच्या प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे,बीड जिल्ह्याच्या खा.प्रितम मुंडे,  माजी मंत्री प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, माजी आ.पृथ्वीराज साठे, आ.संगिता ठोंबरे, संदिप भैय्या क्षीरसागर, बजरंग सोनवणे यांच्यासह इतरांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले. वैद्यनाथ मंदिरात सनई चौघोडा लावण्यात आला होता. तसेच मंदिरात वैद्यनाथचे आकर्षक रांगोळी काढली होती. ही रांगोळी भाविकांचे लक्ष वेधुन घेत होते.
    वैद्यनाथाच्या पायर्‍यावर लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आल्या होत्या. नागमोडी आकाराच्या या बॅरिकेट्स मधुन भक्त वैद्यनाथ मंदिरात रांगेत थांबुन दर्शन घेत होते. महिलांसाठी स्वतंत्र रांग लागली होती. व  पुरुषांसाठी तसेच पास धारकांसाठी स्पेशल रांग लावली होती. मंगल भवन मध्ये भाविकांसाठी बैठकी व्यवस्था करण्यात आली होती. महाशिवरात्र असल्याने सोमवारी पुर्वेकडील वैद्यनाथ मंदिराचा दरवाजा उघडण्यात आला होता. या पुर्वेकडील दरवाज्यातुन धर्मदर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांना मंदिरात येता आले. महाशिवरात्र, श्रावण सोमवार व सणासुदीत गर्दीच्या वेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिराचा पुर्वेकडील दरवाजा उघडुन भाविकांना या दरवाज्यातुन मंदिरात येण्याची सोय केली जाते.  महाशिवरात्र व सोमवार हे एकाच दिवशी आल्याने वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी होती. दुपारी 3 वाजेपर्यंत 3 लाख भाविकांनी प्रभु वैद्यनाथचे दर्शन घेतले. अशी माहिती वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सेके्रटरी राजेश देशमुख यांनी दिली. 3 लाखांच्या आसपास भाविकांनी दर्शन घेतले असल्याच्या माहितीस पोलिस सुत्रांनीही दुजोरा दिला आहे. 
    वैद्यनाथ मंदिर परिसरात गर्दीचे नियोजन करण्यासाठी बीडचे जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अजित बोर्‍हाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश गायकवाड, बीडचे गृहउप पोलिस अधिक्षक भास्करराव सावंत, परळी शहरचे पोलिस निरीक्षक देविंदास शेळके, संभाजीनगरचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, श्री.गाडे, पोलिस उपनिरीक्षक रमेश जाधवर, विकास आडे, अनुसया माने यांच्यासह जिल्ह्यातील 26 पोलिस अधिकारी, 260 पोलिस कर्मचारी, 70 महिला पोलिस कर्मचारी, एस.आर.पी., आर.सी.पी., क्यु.आर.टी.चे प्रत्येक एक प्लॅटून व 100 होमगार्डसचा बंदोबस्त होता. याशिवाय बॉम्बशोध नाशक पथक दरोडा प्रतिबंधक, एलसीबी व इतर पोलिस पथक डोळ्यात तेल घालुन सतर्क होते. 
    वैद्यनाथ मंदिरात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. मंदिर परिसरातील शनि मंदिर समोर अन्नपुर्णा ट्रस्ट, थर्मल कॉन्ट्रक्टर असोसिएशन, नगर परिषद परळी वैजनाथ, व्यापारी संघटना व इतर सामाजिक संघटनेच्या वतीने भक्तांना शाबुदाणा खिचडीची सोय करण्यात आली होती. वैद्यनाथ मंदिर परिसरात प्रसाद साहित्य व खेळणीच्या दुकानावर यात्रे करुंची गर्दी झाली होती. राहाट पाळणे उभारली आहेत. याठिकाणीही यात्रेकरुंची संख्या होती. 
    जिरेवाडी येथुन श्री सोमश्‍वराची पालखी वैद्यनाथाच्या दर्शनासाठी वाजत गाजत आली. भगवानबाबा चौक, शिवाजी चौक, स्टेशन रोड, कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, राणी लक्ष्मीबाई टॉवर, नेहर चौक सोमश्‍वराची पालखी मिरवणुक वैद्यनाथ मंदिरात आली. पालखीचे ठिकठिकाणी रांगोळ्या काढुन स्वागत करण्यात आले. पालखी मिरवणुकीत कलशधारी महिला आग्रभागी होत्या. टाळ मृदंगांच्या निंनादात पालखी मंदिर कडे आली. या पालखीचे राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे, काँग्रेसचे अखिल भारतीय कार्यकारणीचे सदस्य तथा राज्य सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे यांनी दर्शन घेतले. पालखीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी पालखी मार्गावर पाणी, चहा  व फराळाची विविध संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.  
    वैद्यनाथ मंदिर रोडवरील श्री जगमित्र नागा मंदिर व सोपान काका मंदिरातुनही पालखी निघाली. वैद्यनाथाचे दर्शन घेऊन मेरु प्रदक्षिणा केली. या पालखी मिरवणुकीत भाविक उत्साहाने सहभागी झाले होती. 
    शहरातील श्री संत जगमित्र नागा मंदिरातही सकाळ पासुन भाविकांची गर्दी झाली होती. तसेच शहरातील सुर्वेश्‍वर मंदिर, सोपानकाका मंदिर, धर्मापुरी, तपोवन, लाडझरी, मालेवाडी, टोकवाडी, पोहनेर,  येथील मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलुन गेले होते.

No comments:

Post a Comment