तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट : शिवसेनेने केली वचनपूर्ती


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
मुंबई : दि.८ मुंबई महापालिका निवडणुकीच्यावेळी शिवसेनेने मुंबईकरांना 500 चौरस फूट व त्यापेक्षा कमी आकाराच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचे वचन दिले होते. ते पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने मुंबई महापालिकेत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करून राज्य सरकारकडे पाठवला होता. अखेर शुक्रवारी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब झाला. शिवसेनेची मागणी मान्य करत मालमत्ता कर रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्याचे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
मुंबईकरांसाठी आज एक खूशखबर असून शुक्रवारी राज्यमंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला. 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याची शिवसेनेची मागणी राज्य मंत्रिमंडळाने मान्य करत याला मंजुरी दिली आहे. या संदर्भात शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुंबईतील 500 चौरस फूट व त्यापेक्षा कमी क्षेत्रफळांच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याबाबत सरकारतर्फे लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांना दिले होते.
मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील निवासी इमारतींमधील 500 चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी गाळ्यांचा मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्यात यावा आणि 501 ते 700 चौरस फुटांपर्यंत चटईक्षेत्र असलेल्या निवासी गाळ्यांना मालमत्ता करातून 60 टक्के सवलत देण्यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने 6 जुलै 2017 रोजी ठराव केला आहे. त्याअनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

No comments:

Post a Comment